MLA Lahu Kanade in Shrirampur: काँग्रेस पक्षाने लोकशाही पद्धतीने कारभार करून समतेचा विचार रुजविला. युवकांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून काँग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोहोचवून भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आणावा, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले.
काँगेस पक्षाच्या वतीने येथील आमदार कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात आयोजित श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील पक्षाचे बथ प्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. तालुकाध्यक्ष अरुण नाईक अध्यक्षस्थानी होते. सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक कानडे, डॉ. वंदना मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे, कार्लस साठे, ॲड. समीन बागवान उपस्थित होते.
कानडे म्हणाले, की काँग्रेसने सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेऊन देशाचा विकास केला. भाजप सरकारने सत्तेत आल्यापासून हे चक्र उलटे फिरण्यास सुरुवात केली. त्यासाठी संघटितपणे कट करून सतत खोटे सांगून दिशाभूल केली. इथेनॉल उद्योगात ७० हजार कोटीची गुंतवणूक असताना इथेनॉलवर बंदी घालून हा निर्णय पुन्हा बदलण्याची वेळ आली. जनतेकडून वस्तू सेवा कराच्या माध्यमातून पैसा गोळा केला. तालुकाध्यक्ष अरुण नाईक यांनी बूथ कमिटी, शहर, तालुका कमिटी या विषयीची माहिती दिली. (Latest Marathi News)
मतदान प्रतिनिधीची जबाबदारी वाढली
निवडणूक आयोगाने ८० वर्षांपुढील व्यक्तीचे मतदान घरी जाऊन घेण्याचे सुचविले आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधीची जबाबदारी वाढली आहे. काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर अधिक भर दिला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर यासारख्या साधनांचा वापर वाढवावा लागणार आहे. तरुणांनी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कॉंग्रेस पक्षाचा विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहाचवावेत, असे आवाहन कानडे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.