अहमदनगरमध्ये भाषण अपघाताची घटना समोर आली आहे. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळ्यात उसाने भरलेला ट्रक उलटला. या ट्रकखाली चिरडून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोघे जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी सहावाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
उसाने भरलेला दहा टायर ट्रक (एमएच- १२ एचसी- ९६६६) श्रीरामपूरकडून बाभळेश्वरकडे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जात होता. खंडाळ्यातील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीजवळ ट्रक आल्यानंतर डाव्या बाजूला झुकून उलटला. त्याचवेळी रस्त्याच्या कडेने जाणारी खंडाळा येथील रहिवासी उषाबाई बाळासाहेब विघावे ही महिला ट्रकखाली दाबली गेली. तसेच दुचाकीवरून जाणारे नरसाळी (ता. श्रीरामपूर) येथील दोघेजण जखमी झाले.
मोठ्या वर्दळीत अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. घटनेत उसाखाली दबलेल्या महिलेसह दोघांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. दरम्यान, अपघातातील जखमींची नावे अनिल बाळासाहेब महाडिक व ऋत्विक बाबासाहेब आढाव असून, त्यांना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
गावातील अमोल साबदे व मरकडे यांनी जेसीबी आणून ऊस बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील वाहतूक लांबपर्यंत ठप्प झाली होती. यावेळी पोलिस यंत्रणेकडून वाहतूक काहीकाळ थांबून सुरळीत करण्यात आली. कोल्हार येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे नगर-मनमाड महामार्गाची वाहतूक बाभळेश्वर मार्गे श्रीरामपूरकडून वळविण्यात आल्याने रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
खंडाळा-नांदूर रस्ता अपघाताचे केंद्र
खंडाळा-नांदूरपर्यंतचा रस्ता अपघाताचे केंद्र बनला आहेत. यापूर्वीही आज (ता.१०) अपघात झालेल्या ठिकाणाच्या विरुद्ध बाजूला तसेच नांदूर पुलाजवळही उसाचा ट्रक उलटून अपघात झाले आहेत. त्यात शासकीय अभियंता पटेल यांना जीव गमवावा लागला होता. आजच्या अपघाताने या घटनेला उजाळा मिळाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.