Ahmednagr temple sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News: मंदिरावरील शिलालेखाने इतिहासातील माहिती उघड

Ahmednagar News: 'हे जागृत देवस्थान असून, परिसरातील अनेक भाविकांची या खंडेश्वरावर श्रद्धा आहे.'

मार्तंड बुचुडे

Ahmednagar News- दैठणे गुंजाळ येथील खंडेश्वर मंदिरास असलेल्या दरवाजावर एक सुंदर शिलालेख कोरला आहे. त्यावरून या मंदिराची पुरातन माहिती समोर आली आहे.

या शिलालेखाचे वाचन इतिहास संशोधक सतीश सोनवणे यांनी केले. शिलालेख ९ ओळींचा असून, सुरवात श्री या अक्षराने आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत जेजुरीचे खंडेराय हे शिवाचे रूप आहे, असे दाखविण्यासाठी श्री सांब सदाशिव, गौरी रमण, कैलासपती अशी विशेषणे वापरली.

खंडोबासाठी पीतवस्त्राभरण, हरिद्राचूर्ण भांडारभूषण आदी विशेषणे वापरली आहेत. दैठणेतील लिंग हे त्या कुलस्वामी खंडोबाचेच रूप आहे, असे म्हटले आहे. त्याच्या चरणी तत्पर असणाऱ्या माणकोजी गुंजाळ यांनी तटबंदीचा दरवाजा बांधला. या कामाचा प्रारंभ दसऱ्याच्या दिवशी, २१ ऑक्टोबर १७८७ रोजी केला असल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. (Latest Marathi News)

दैठणे गुंजाळ या एका छोट्याशा गावातील टेकडीवर खंडेश्वराचे एक सुंदर मंदिर आहे. या मंदिराला दगडी तटबंदी आहे. तटबंदीच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला हा शिलालेख आहे.

शिलालेखाचा काळ : अश्विन शुद्ध १०, शके १७०९ (इंग्रजी तारीख २१ ऑक्टोबर १७८७ रविवार) हा सवाई माधवराव पेशवे यांचा काळ होता. (Marathi Tajya Batmya)

हे जागृत देवस्थान असून, परिसरातील अनेक भाविकांची या खंडेश्वरावर श्रद्धा आहे. जिल्ह्यासह नाशिक, पुणे जिल्ह्यांतूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.

- बंटी गुंजाळ, सरपंच, दैठणे गुंजाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT