Ahmednager sakal
अहिल्यानगर

Ahmednager : जिल्ह्यात ५८ शाळा होणार स्मार्ट!

बीओटीतून पालटणार रूप; पालकमंत्र्यांचा पुढाकार

अशोक निंबाळकर

बीओटीतून पालटणार रूप; पालकमंत्र्यांचा पुढाकार

अहमदनगर : जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा वर्गखोल्या नाहीत. बहुतांश ठिकाणी वर्ग उघड्यावर भरतात. ७५ वर्ग निर्लेखन झाल्याने कमी झाले. या वर्षी तब्बल सव्वाआठशे वर्गखोल्यांची आवश्यकता आहे.

पुरेसा निधी मिळत नसल्याने हा प्रश्न निकाली निघत नाही. परिणामी, अध्ययनावर परिणाम होतो. यावर तोडगा काढण्यासाठी शाळा बीओटीवर बांधण्याचा विचार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाची तयारी सुरू आहे. प्राथमिक स्तरावर ५८ शाळांची माहिती मागवली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील ५८ शाळा निवडल्या आहेत. त्यात जिल्ह्याच्या दक्षिण भागातील २५, तर उत्तर भागातील ३३ शाळांची निवड केली आहे. सहजासहजी त्या जागांवर वर्ग विकसित केले जाऊ शकतील, अशा शाळा निवडल्या आहेत. बीओटीतून शाळा बांधल्यास विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. तसेच शासनावरील आर्थिक ताणही हलका होण्यास मदत होईल.

कोणत्या शाळा ?

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा लोकल बोर्डाच्या नावावर असलेल्या शाळांना पसंती देण्यात आली आहे. दक्षिण विभागात कर्जतमधील प्राथमिक शाळा, मिरजगाव, राशीन येथील मुला-मुलींच्या शाळांचा त्यात समावेश आहे. श्रीगोंद्यात शहरातील व हंगेवाडी, शेवगावात शहर व चापडगाव, घोटण, जामखेड शह व हळगाव, पाथर्डी व तिसगाव, पारनेर मुले-मुली, नगरमध्ये जेऊर व केडगाव.

उत्तरेत राहाता येथे बाभळेश्वर, साकुरी, पिंपरी निर्मळ, गोदावरी वसाहत, निमगाव कोऱ्हाळे, सावळीविहीर बुद्रुक, पुणतांबे, एकरुखे, अस्तगाव, केलवड. श्रीरामपूरमध्ये टाकळीभान, गोंडेगाव, गळनिंब. कोपरगाव - येसगाव, धामोरी, रवंदे.

संगमनेर - आश्वी खुर्द, राजापूर, घुलेवाडी, निळवंडे, बोटा. अकोले - रणद खुर्द, भोळेवाडी, तीर्थाची वाडी. नेवासे - सोनई नं. २, नेवासे मुले, रांजणगाव देवी, सोनई नं.१, सोनई नं. ५. राहुरी - देवळाली प्रवरा, वांबोरी, ब्राह्मणी येथील या शाळा आहेत.

कोल्हार, सात्रळला सक्सेस

जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत, परंतु त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे त्यांचा काहीच उपयोग होत नाही. जिल्ह्यात यापूर्वी राहाता तालुक्यातील सात्रळ व कोल्हार येथील शाळा बीओटीवर बांधल्या आहेत. गेल्या वर्षीपासून हे काम सुरू आहे. कोल्हार येथील शाळेची प्रशस्त इमारत झाली आहे. बीओटीचा प्रयोग तेथे यशस्वी झाला आहे.

जिल्ह्यातून ५८ शाळांची माहिती आली आहे. ती पुढील कार्यवाहीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही होईल. विकासक पुढे आल्यास या शाळा विकसित होतील.

-भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT