Ajit Pawar Pink Jacket news esakal
अहिल्यानगर

Ajit Pawar: गुलाबी गुलाबी झालं राजकारण... जॅकेटवरुन महिलेचा प्रश्न अन् अजित पवारांचे भन्नाट उत्तर! VIDEO एकदा पाहाच

Ajit Pawar Pink Jacket: अहमदनगर येथे 'माझी लाडकी बहिण योजना' महिला मेळाव्यात एका महिलेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुलाबी जॅकेटवरुन प्रश्न विचारला.

Sandip Kapde

लोकसभा निवडणुकीत फक्त एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार कंबर कसली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आता गुलाबी झाली आहे. अजित पवारांच्या सभेत गुलाबी रंगाचा वापर वाढला आहे. बॅनर, कार्यक्रमात गुलाबी रंगाचा वापर वाढला आहे. अजित पवार देखील गुलाबी रंगाचे जॅकेट घालायला लागले आहेत. त्यामुळे हे गुलाबी राजकारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

गुलाबी जॅकेटवरुन विचारले प्रश्न-

अहमदनगर येथे 'माझी लाडकी बहिण योजना' महिला मेळाव्यात एका महिलेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुलाबी जॅकेटवरुन प्रश्न विचारला. सगळीकडे पिंक कलर दिसतो आहे आणि तुम्ही देखील पिंक कलरचं जॅकेट घातलं आहे, काय कारण आहे? असा प्रश्न महिलेने विचारला. यावर अजित पवार यांनी मिश्किल उत्तर दिले.

अजित पवारांचे मिश्किल उत्तर-

अजित पवार म्हणाले, "आपण देखील वेगवेगळे कपडे घालता. वेगवेगळ्या साड्या नेसता. एखाद्या जवळच्याने सांगितलं की ही साडी जास्त खुलून दिसते, तर तुम्ही सारखी सारखी ती साडी नेसता. तसंच मला माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की हे जॅकेट जरा चांगलं दिसतं त्यामुळे मी सारखं सारखं घालत आहे. याला काही विशेष कारण नाही, तुम्हाला कोणी सांगितलं एखादी गोष्टी छान दिसते तर तुम्ही जास्त वेळ घालता, तसंच माझंही आहे," असे अजित पवार म्हणाले.

गुलाबी जॅकेट्स आणि महिला मतदारांचा आकर्षण-

माहितीनुसार, अजित पवार यांनी १२ गुलाबी जॅकेट शिवून घेतले आहेत. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा फंडा राबल्याचे बोलले जात आहे. 'माझी लाडकी बहिण योजना' महिला मेळाव्यात गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे दिसते.

' डिझाईन बॉक्स' कंपनीचा सहभाग-

अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराचे काम 'डिझाईन बॉक्स' ला कंपनीला दिले आहे. अशी चर्चा आहे की या कंपनीच्या सल्ल्यानेच अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सर्व आमदारांसह सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. तसेच कंपनीच्या सल्ल्यानुसारच अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला निखारण्यासाठी गुलाबी रंगाचा अधिक वापर करायचा आहे.'डिझाईन बॉक्स' कंपनीने यापूर्वी कर्नाटकात डी.के. शिवकुमार आणि राजस्थानात अशोक गहलोत यांच्यासाठी काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : विकासकामे न करणाऱ्यांकडूनच टीका : शंभूराज देसाई; सुपने येथे प्रचार सभा, टीका न करता कामे करत राहण्याचा निर्वाळा

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

The Sabarmati Report : 12th Fail फेम विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची जादू पडली फिकी ; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

SCROLL FOR NEXT