School Phobia sakal
अहिल्यानगर

School Phobia : सावधान! मुलांना असू शकतो ‘स्कूल फोबिया’; काय घ्यावी काळजी?

जर तुमचे मूल शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करीत असेल, नेमकं शाळेच्या वेळी कुठेतरी लपून बसत असेल, आजारी असल्याचे नाटक करीत असेल तर सावधान! त्याला ‘स्कूल फोबिया’ झालेला असू शकतो.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - जर तुमचे मूल शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करीत असेल, नेमकं शाळेच्या वेळी कुठेतरी लपून बसत असेल, आजारी असल्याचे नाटक करीत असेल तर सावधान! त्याला ‘स्कूल फोबिया’ झालेला असू शकतो. यासाठी पालकांनी मुलांचे बारकाईने निरक्षण नोंदवून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. मुलांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

एका पालकाने सांगितले, की शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी तो शाळेत न जाण्यासाठी काहीतरी बहाणे शोधत असतो. काल त्याने स्वतःचेच बूट लपवून ठेवले. बूट शोधण्यासाठी सर्वांचीच धावपळ झाली. अखेर गच्चीवर पाण्याच्या टाकीमागे बूट आढळून आले.

मात्र, तोपर्यंत शाळेची वेळ निघून गेली होती. दररोज तो शाळेची वेळ झाली की पोट दुखते, डोके दुखतं, मळमळ होतेय! असे वेगवेगळे बहाणे करतो. आपली मुलेही असेच काहीसे नियमित करीत असतील तर पालकांनी याकडे दुर्लक्ष करू नये.

शाळा टाळण्याची लक्षणे

  • शाळेबद्दल निरर्थक तक्रारी करणे

  • घरी राहण्यासाठी रडणे

  • घरीच अभ्यास करतो; पण शाळेत जाणार नाही

  • शाळेतून लवकर घरी येण्यासाठी जिद्द करणे

  • ऐन शाळेच्या वेळी शाळेच्या वस्तू लपवणे

  • शाळेत गेल्यावर आजारपणाचे नाटक करून झोपणे

‘स्कूल फोबिया’ची लक्षणे

  • जलद हृदय धडधडणे

  • शरीराचा थरकाप उडणे

  • स्नायू कमकुवत होणे

  • गुदमरणे, श्वास

  • घेण्यास त्रास

  • तीव्र घाम येणे, डोके दुखणे

मुले शाळेत जाणे का टाळतात?

  • इतर मुलांकडून थट्टा होणे

  • वर्गमित्रांची सततची गुंडगिरी

  • समवयस्क वा वरिष्ठ वर्गातील मुलांकडून रॅगिंग

  • प्रचंड मानसिक तणाव

  • शिक्षकांकडून मानसिक दबाव

पालकांचे कर्तव्य

  • शाळेचे महत्त्व समजून सांगा

  • मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करा

  • शाळेतून आल्यावर त्यांची प्रशंसा करा

  • शाळेबद्दल सकारात्मक वातावरण तयार करा

  • शाळेतील गमतीजमती सांगण्यास प्रेरित करा

  • घरी राहिल्यास त्याला खेळायला मिळणार नाही,

  • अभ्यास करावा लागेल, असे पटवून द्या.

  • मुलांशी मित्राप्रमाणे नियमित संवाद साधा

  • मुलांना स्वतः शाळेत सोडा अन् घ्यायला जा

  • इतर मुलांशी मैत्री करण्यास प्रोत्साहित करा

  • शाळेत समस्या आल्यास ती सोडविण्यास मदतीची हमी द्या

गांभीर्याने लक्ष द्या

  • मुलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका

  • वेळोवेळी शिक्षकांशी संवाद साधा

  • शाळेत काही समस्या आहे का? याची चौकशी करा

  • शिक्षक व इतर मुलांचा आपल्या मुलांप्रती व्यवहार समजून घ्या

  • कुणी त्यांना शारीरिक त्रास देतेय का? हे सुनिश्चित करा

  • मूल शाळेत जाण्यास ऐकत नसेल, तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या

लहान मुलांमध्ये फोबियाचे रुग्ण हल्ली वाढू लागले आहेत. आपल्या पाल्याबाबतीत अशा तक्रारी असल्यास पालकांनी त्वरीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. कारण वेळीच त्यावर उपाययोजना झाल्या नाही, तर पुढे त्याचा त्रास विद्यार्थी व पालकांना अधिक होतो. वेळेत उपचाराने या स्थितीतून मुले बाहेर पडतात, हे लक्षात घ्यावे.

- डॉ. अशोक कराळे, मानसोपचारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतांच्या फुटीचा जलील यांना फटका

Devendra Fadnavis : फडणवीस यांचा विजयी ‘षटकार’

SCROLL FOR NEXT