Ambadas Danve Replied to Radhakrushn Vikhe: ज्यांनी शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपद, राज्यात कॅबिनेट मंत्रिपद उपभोगून पुन्हा काँग्रेस आणि आता भाजपकडून मंत्रिपद उपभोगले. त्यांनी शिवसेनेला शिकवण्याची गरज नाही
अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्यावर केली. उद्धव ठाकरे यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ते इंडिया आघाडीचे नेतृत्व करायला निघालेत अशी टीका विखेपाटील यांनी केली होती. या टीकेचा समाचार दानवे यांनी आज घेतला.
दानवे यांच्या उपस्थितीत आज जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, रावसाहेब खेवरे, सचिन बडदे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, संजय छल्लारे उपस्थित होते.(Latest Marathi News)
दानवे म्हणाले, की शासन आपल्या दारी कार्यक्रमातून सरकारने कोणतेही दिवे लावले नाही. दिव्याखाली अंधार आहे. जनतेच्या जीवनात काही उजेड आणण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करत आहे.
तर भुजबळांनी राजीनामा द्यावा!
मराठा आरक्षण संबंधी सर्वोच्च न्यायालयात क्युरिटिव्ह पिटीशन दाखल आहे, त्याचा निर्णय अद्याप यायचा आहे. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होताना यावर अधिवेशनात सविस्तर चर्चा होईल. मंत्रिमंडळाचा निर्णय हा सामूहिक असतो. छगन भुजबळ यांना अडचण वाटत असेल व त्यांच्यात स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.