अंबित धरण ओव्हर फ्लो 
अहिल्यानगर

पावसाळ्यापूर्वीच अकोल्यातील धरण झाले ओव्हर फ्लो

​शांताराम काळे

अकोले : जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांशी भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या ओलीवर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, कृषी विभागाने एवढ्या कमी पावसावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा सल्ला दिला आहे.

मान्सून अजून पुढे सरकला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सात जूनचा मुहूर्त टळून गेला आहे. अशा स्थितीत अकोले तालु्क्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. विशेष म्हणजे तेथील एक धरण ओव्हरफ्लो झाले आहे.(Ambit dam overflow in Akole taluka)

अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील लघु पाटबंधारे तलाव अंबीत पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हर फ्लो झाले आहे. सदर प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १९३ दशलक्ष घनफूट आहे. सद्यस्थितीत साधारणत: २००-३०० क्युसेक्स विसर्ग मुळा नदीमध्ये प्रवाहीत होत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी दिली.

मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. शेतकरी आपल्या शेतात व्यग्र आहे. मागील वर्षी पहिल्या आठवड्यात अंबित जलाशय भरला होता. यावर्षी दोन दिवस उशिरा जलाशय भरला आहे. पाणलोट व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकरी गाळ तुडवणे रोप लावणीच्या तयारीत आहेत. छोठे-मोठे ओढे नाले भरून वाहत असल्यामुळे हा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.

अंबित जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ उन्हाळ्यात जलसंपदा विभागाने काढल्यास या जलसाठ्याची क्षमता वाढेल. तसेच या मातीचा उपयोग पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना होईल, तसेच या जलाशयाच्या पायातून लिकेज आहे. ही गळती थांबवून पाण्याची उधळपट्टी थांबणे आवश्यक आहे. या लघु पाटबंधारे विभागच्या ठेकेदाराने काही काम अपूर्ण ठेवले असून ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.

- सयाजी अस्वले (सरपंच कुमशेत) (Ambit dam overflow in Akole taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT