Amit Shaha esakal
अहिल्यानगर

खासगीकरण करणाऱ्यांनी मला सल्ले देऊ नये - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी (जि. अहमदनगर) : ‘‘मोदी सरकारने (Modi government) सहकारी साखर उद्योगाला आधार देणारे मोठे निर्णय घेतलेत. येथे फक्त तीन जिल्हा सहकारी बॅंका सुरू आहेत, उर्वरित बॅंका गेल्या कुठे ? साखर कारखाना कुणाचा, हे पाहून राज्य सरकार मदत करणार असेल, तर कसे चालेल? सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करणाऱ्यांनी मला सल्ले देऊ नयेत, अशा शब्दांत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षातील सहकार क्षेत्रातील धुरिणांवर टीका केली.
भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या पुढाकारातून प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी शहा यांच्या हस्ते, पद्‌मश्री पुरस्कारप्राप्त पोपटराव पवार (Popatrao Pawar) व राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांचा सत्कार करण्यात आला.

कपाळाला माती लावून मी पुढे निघालो आहे - शहा

‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसूत्रीवर आधारित हिंदवी स्वराज्य स्थापन केले. संत ज्ञानेश्वरांनी (Sant Dnyaneshwar) विश्वकल्याणाची प्रार्थना, तर साईबाबांनी (Sai Baba) सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. या महाराष्ट्रात विठ्ठलराव विखे पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांनी एकत्र येऊन प्रवरानगर येथे सहकारी साखर कारखानादारीची मुहूर्तमेढ रोवली. ही सहकाराची काशी आहे. येथील माती कपाळाला लावून मी पुढे निघालो आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे मोदींचे स्वप्न साकार करण्याची क्षमता सहकारात असल्याने, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली.’’

सहकारी साखर उद्योगाला बळ देणारे धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतले. कच्च्या साखरेच्या आयातीवर कर लादले, निर्यात अनुदान दिले, इथेनॉल (Ethanol) नीती तयार करून ती अमलात आणली. त्यामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाल्याचेही शहा यांनी सांगितले.

पारदर्शक कारभार हवा

सहकारी साखर कारखानदारी व सहकारी संस्थांना काळानुरूप बदलावे लागेल. पारदर्शक कारभार, कार्यक्षमता व व्यावसायिक दृष्टी अंगीकारावी लागेल. संगणकीकरण व व्यावसायिक कौशल्यप्राप्त युवकांना दैनंदिन कारभारात संधी देऊन स्पर्धेत उतरण्याची तयारी ठेवावी लागेल.

तोडणारा नव्हे, तर जोडणारा सहकारमंत्री

‘सबका साथ, सबका विकास’ प्रत्यक्षात आणण्याची क्षमता फक्त सहकारात आहे. प्रवरानगर ही सहकारी साखर कारखादारीची काशी आहे. मी तोडणारा नव्हे, तर जोडणारा सहकारमंत्री म्हणून महाराष्ट्रात आलोय, असेही शहा यांनी सांगितले.

''सहकारी बॅंकांसमोरील अडचणी दूर करण्यास आपण प्राधान्य देऊ. त्यासाठी आणखी एखादी समिती न नेमता थेट सुधारणांना सुरवात करू. पुढील पंचवीस वर्षांचा विचार करून सहकार नीती तयार करण्यावर आपला भर असेल.'' - अमित शहा, केंद्रीय सहकारमंत्री

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेंद्र विखे पाटील यांच्याबरोबरच, अहमदनगरसह विविध जिल्ह्यांतून आलेले आजी-माजी आमदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT