amit thackeray 
अहिल्यानगर

Assembly Elections 2024 : अमित ठाकरेंनी नगरमधून लढावे; शहरातील मनसेच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

Assembly elections 2024 : अमित ठाकरे यांनी नगरमध्ये विधानसभा निवडणूक लढावी, अशी मागणी करणारे फलक शहरभर लावले आहेत. या मागणीवर चर्चेला उधाण आलं असून, राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी नगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवावी, अशा आशयाचे फलक लागले आहे. हे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यावरून तर्क-वितर्कही काढले जात आहेत. भाजप नेत्यांपाठोपाठ ‘मनसे’तही राज्यस्तरीय नेत्यांना आवाहन केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित वर्मा यांच्या कार्यकर्त्यांनी हे फलक लावले आहेत. दिल्ली दरवाजा परिसरात तसेच शहराच्या इतर भागात हे फलक डकवले आहेत. त्यावरील मजकूरही चर्चेला कारणीभूत ठरत आहे. मध्यंतरी ठाकरे यांनी नगरचा दौरा केला होता. तोही या मागणीला संदर्भ आहे का, याचाही तर्क लावला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. कोण कोणत्या पक्षाकडून किंवा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याचे आडाखे बांधायला सुरूवात झाली असतानाच थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच नगरमध्ये लढण्याचे आवाहन केले जात आहे.

नगरमध्ये संग्राम जगताप विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी झाल्यानंतर ते सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीत समाविष्ट आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेसनेही दावा सांगायला सुरूवात केली आहे. त्यामुळे विविध नावे समोर येत आहेत.

मुंडे, थोरातांचीही मागणी

लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी त्यांना नगरमधून विधानसभेची निवडणूक लढण्याची विनंती केली होती. त्यानंतर चांगलेच राजकारण तापले. या मागणीनंतर काँग्रेसमध्येही अशीच मागणी समोर आली होती. काँग्रेसचे शहरातील नेते दीप चव्हाण यांनी नगरमधून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा आग्रह धरला होता. तोही मुद्दा चांगलाच गाजला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT