चार दिवसांपूर्वी आठवण काॅलनी परीसरात चार चोरटे आले होते. तेथील तीन चार घरांची पाहणी केली. मात्र, एका घरातील आवाजाने ते पळून गेले.
सोनई (अहमदनगर): सोनई गाव व वाड्या वस्त्यांवर चार दिवसांपासून चोर-पोलिसांचा पाठशिवणीचा खेळ चांगलाच रंगला आहे. आले आले..घुसले..अरे पळाले... अशा गहजबाने सर्वांच्याच झोपा उडाल्या आहेत. चोरी कुठेच झाली नसली तरी धास्ती मात्र वाढली आहे.
चार दिवसांपूर्वी आठवण काॅलनी परीसरात चार चोरटे आले होते. तेथील तीन चार घरांची पाहणी केली. मात्र, एका घरातील आवाजाने ते पळून गेले. काल सोमवारी रात्री दीड वाजता स्वामी समर्थ केंद्राजवळ पाच ते सहा चोर उभे होते. येथे शेजारी ओरडल्यानंतर चोर पळाले. संतोष निमसे, राजेंद्र बोरुडे, डाॅ.गुरसळ यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरांचे संशयास्पद फिरणे टिपले गेले आहे.(An atmosphere of fear due to thieves in Sonai)
चार दिवसांपासून रोजच चोरटे गावात व वस्तीवर दिसत आहेत. पोलिस आणि काही युवकांनी त्यांचा पाठलागसुध्दा केला. मात्र, कुणीही हाताला लागले नाही. चोरांच्या भीतीने अनेकांना रात्र जागून काढावी लागत आहे. गावात लाखो रुपये खर्चून लावलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. पोलिस ठाण्याचा दूरध्वनी एक वर्षापासून बंद आहे. संपर्क करूनही पोलिस वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे. येथील पोलिस यंत्रणा शोभेची वस्तू असल्याचे उघड बोलले जाते.
गावात व वस्तीवर चोरांची वर्दळ वाढली असल्याने रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. चोरी, दरोड्यातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून आहोत. रात्रीसाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोरोना काळात लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे घरात पैसा आकडा नाही. जे थोडेफार किडून मिडूक आहे. त्यावरही डल्ला मारला जात आहे. बहुतांशी घरात कोरोनाचे रूग्ण असल्याने घरे बंद आहेत. तर काही गावात साथ असल्याने दुसऱ्या गावी गेले आहेत. त्यांच्या घरांनाही कुलूप आहे. अशा घरांवर चोरट्यांकडून पाळत ठेवली जाते.
पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली नाही तर सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पाहून संशयितांना पकडावे, त्यामुळे गावकऱ्यांत असलेली चोरट्यांची दहशत संपेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
- रामचंद्र कर्पे, सहायक पोलिस निरीक्षक.
काॅलनीत चार ते पाच चोरटे हत्यारासह फिरताना दिसले. ही टोळी रात्री कुलूप असलेल्या घरांचा शोध घेत असावी असा अंदाज आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे.
- डाॅ.संतोष गुरसळ, ग्रामस्थ. (An atmosphere of fear due to thieves in Sonai)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.