anna hajare koshyari  saka media
अहिल्यानगर

हजारेंनी विकासाचा रस्ता दाखविला; राज्यपाल कोश्यारी

राळेगणसिद्धी ग्रामस्थांना अण्णांनी विकासाचा रस्ता दाखविला, त्याप्रमाणे आम्हाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील दाखविला आहे

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : राळेगणसिद्धी ग्रामस्थांना अण्णांनी विकासाचा रस्ता दाखविला, त्याप्रमाणे आम्हाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील दाखविला आहे. अण्णांच्या विकासाच्या मार्गाने देशात विकासपर्व सुरू आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना केले.

राज्यपाल कोश्यारी यांचे आज दुपारी राळेगणसिद्धी येथे आगमन झाले. गावातील विकासकामांची पाहणी करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांना माहिती दिली. राज्यपालांनी हजारे यांना त्यांच्या गावी येण्याचे निमंत्रण दिले. गावी येणे शक्य नसेल, तर मुंबई येथील राजभवनात काही तरुण गावकऱ्यांना घेऊन या, असे आग्रहाचे निमंत्रण दिले.

कोश्यारी म्हणाले, की अण्णांना प्रणाम म्हणजे ईश्वराला प्रणाम आहे. अण्णांनी राबविलेला सौरऊर्जा प्रकल्प आज पंतप्रधान मोदी संपूर्ण देशभरात राबवीत आहेत. राळेगणसिद्धीत त्यांनी केलेली विकासकामे ही देशाला दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत. लवकरच ही सर्व कामे पाहण्यासाठी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसमवेत मी पुन्हा एकदा राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर येणार आहे.या वेळी राज्यपालांनी पाझर तलाव, गॅबियन बंधारा, ग्रामविकासाचे माहिती केंद्र, अडीच कोटी लिटरचे शेततळे, आजवर आंदोलन केलेल्या घटनांबाबतचे माहिती केंद्र, अशा विविध ठिकाणांना भेट दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार गणेश आढारी, पोलिस निरीक्षक घनशाम बळप, गटविकास अधिकारी किशोर माने, सभापती गणेश शेळके, सरपंच धनंजय पोटे, लाभेश औटी, जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दादा पठारे, संदीप पठारे, गणेश भापकर, श्याम पठाडे, कमल पंत आदी उपस्थित होते.

मित्रांप्रमाणे दिले आलिंगन

राज्यपाल कोश्यारी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांनी अण्णा हजारे यांना आलिंगन दिले. त्यावेळी ते म्हणाले, की ग्रामीण भागाची शान असलेले धोतर सर्वांनी परिधान का केले नाही? संपूर्ण दौऱ्यात दोघेही जवळपास समवयस्क असल्याने, मित्राप्रमाणे राज्यपालांनी अण्णांचा हात हातात घेत येथील सर्व विकासकामांची पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT