Anna Hazare 
अहिल्यानगर

Anna Hazare: अजित पवारांच्या क्लीनचीट विरोधात खरंच कोर्टात धाव घेतली का? आण्णा हजारेंनी स्पष्टच सांगितलं

शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं क्लीनचीट दिली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिखर बँक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं क्लीनचीट दिली होती. या कथित घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.

या रिपोर्टविरोधात ज्योष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी कोर्टात याचिका दाखल केल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या. तसंच यावर राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रियाही देण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द अण्णा हजारे यांनी याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. (Anna Hazare explanation about plea against Ajit Pawar cleancheat regarding State Cooperative Bank Fraud)

नेमकं काय घडलंय?

शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करून काही लोक स्वार्थ साधत असल्याचा आरोप आण्णा हजारे यांनी केला आहे, ते राळेगण सिद्धी इथं बोलत होते.

"मी कधीही या विषयावर बोलत नाही, बोललोही नाही मात्र माझं नाव यात आल्यानं मला धक्का बसला असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. तसेच पंधरा वर्षांपूर्वी मी या प्रकरणाविधात आवाज उठवला होता मात्र आता माझा याच्याशी कुठलाही संबंध नाही. अजित पवारांना दिलेल्या क्लीनचीट संदर्भात ज्यांना माहिती आहे ते बोलतील माझा याच्याशी कुठलाही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT