nagar Sakal
अहिल्यानगर

कृषी विद्यापीठाची कमान नव्या अधिकाऱ्यांवर

शासन स्तरावर समन्वय साधण्यासाठी शासनाच्या या दोन अधिकाऱ्यांची मोठी भूमिका असते.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agricultural University) कुलसचिवपदी कृषी विभागाचे प्रमोद लहाळे तसेच नियंत्रकपदी सुखदेव बलमे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी नियंत्रक विजय कोते (Vijay Kote) यांची बदली झाल्यामुळे व रिक्त असलेल्या कुलसचिवपदी नवे अधिकारी रूजू झाले आहेत. विद्यापीठाचे (University) कार्यपद्धती व शासन स्तरावर समन्वय साधण्यासाठी शासनाच्या या दोन अधिकाऱ्यांची मोठी भूमिका असते.

दहा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याची भूमिका, महात्मा फुले कृषी विद्यापीठासह अनेक संशोधन केंद्रे, विभागीय विस्तार केंद्रे कार्यरत आहेत. शासकीय व खासगी महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाची खालावलेली कामगिरी, घसरलेले मानांकन, पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिक्त जागा, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता, त्यामध्ये पाच दिवसांचा आठवडा, विद्यापीठांच्या दहाही जिल्ह्यांमध्ये वाढलेले अतिक्रमण, विद्यापीठातील अंतर्गत राजकारण, सातव्या वेतन आयोगाबाबत अंमलबजावणी, वेतन देयकाबाबत प्राध्यापकांचे प्रलंबित विषय, कोविड पार्श्वभूमीवर शासनाकडून कमी येणारा निधी, विद्यापीठामध्ये वाढलेले कंत्राटीकरण अशा अनेक समस्यांना सामोरे जावून कृषी विद्यापीठ कसे पुढे नेता येईल व मागील काही वर्षांमध्ये खालावलेली कामगिरी कशी सुधारता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT