Ashadhi Wari 2023  esakal
अहिल्यानगर

Ashadhi Wari 2023 : भक्तिगीतांच्या माध्यमातून नेत्रतज्ज्ञाची ‘आषाढवारी’

डॉ. अर्जुन शिरसाठ यांची निर्मिती नऊ गीतांना लाखोंची पसंती

मुरलीधर कराळे

Ashadhi Wari 2023 - पंढरीरायाला भेटण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. आषाढी वारीला प्रत्येकाला जाणे अशक्यच; परंतु कोणाला सेवेत, तर कोणाला अन्नदानात पांडुरंग दिसतो. येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. अर्जुन शिरसाठ यांनी नऊ गाण्यांची निर्मिती करून ती यू-ट्यूबवर प्रसारित केली आहेत. अनेक वारकरी त्यांना फॉलो करीत आहेत.

संगीतकार, गायक, गीतकार अशा सर्व भूमिका डॉ. शिरसाठ स्वतःच निभावतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पाय पंढरीत पडावेत. नाही विठुरायाच्या पायाचे, तर किमान कळसाचे दर्शन मिळावे, यासाठी वारकरी सध्या पंढरीच्या जवळ गेले आहेत. वाहती चंद्रभागा, विटेवरील पंढरीनाथ जवळून पाहणार आहेत. हे सर्व ध्यानी घेऊन गीतांची शब्दरचना समर्पक गुंफण्यात आली आहे.

डॉ. शिरसाठ मूळचे गंगादेवी (ता. आष्टी) येथील. सध्या नगरच्या शिरसाठ मळ्यात राहतात. वडील आनंदराव, आई निर्मला वारकरी. आजोबा अमृतराव यांच्याकडून वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी खांद्यावर घेतली. शेतात नांगर चालू असला आणि जवळून दिंडी चालली, की आजोबा बैल सोडून दिंडीसोबत जात.

मातीने माखलेले कपडे, ना गाठी भाकर. अशा स्थितीत पंढरीची वाट धरायचे. हीच भक्ती वडिलांनी जपली. संत वामनभाऊ त्यांचे गुरू. त्यांच्या कीर्तनात वीणेकरी असत. उंबरेकर महाराजांचा त्यांना सहवास लाभला. तीच परंपरा आता डॉ. शिरसाठ जपत आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या १३ व्या वर्षापासून महाकवी कालिदास, शिवचरित्र श्रीमान योगी, बाजीराव चरित्र, थोर भविष्यवेत्ता नेस्ट्रॉडेमस ही पुस्तके वाचली. वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस नाशिकला केले.

नेत्रतज्ज्ञ म्हणून डिग्री सोलापूरला मिळविली. १९ वर्षे नगरमध्ये ओपीडी केली. नेत्रतज्ज्ञ म्हणून नाव कमावले; परंतु उपजत गुण असलेले संगीत क्षेत्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. रंगपंचमीची बनविलेली गाणी ‘हीट’ झाली. तेथून प्रेरणा मिळून अनेक गाणी त्यांनी रचली. स्वतः गायिली, संगीतबद्ध केली.

आता आषाढीनिमित्त नऊ भक्तिगीते त्यांनी प्रसारित केली. कोरेश्वर भगवान दिंडीचे प्रमुख सचिन गोंटे महाराजांनी त्यांना प्रोत्साहन दिले. हा छंद जोपासत असताना त्यांना पत्नी सुचेता, मुलगा ऋषी यांची साथही तितकीच महत्त्वाची वाटते. यू-ट्यूबवर डॉक्टरांचे नाव सर्च करताच ही गाणी ऐकता येतात.

चंद्रभागा नदीचे माहात्म्य विशद करताना ते गातात -

चंद्रभागा तू गं, पतित पावनी

आणलेस गं, परब्रह्म अंगणी

कमेंट प्रेरणा देतात

असा देवांचा देव पांडुरंग होऊन गेला

असे रंग जीवनात हो भरून गेला

या ओळी आहेत डॉ. शिरसाठ यांनी रचलेल्या भक्तिगीतांच्या. विठ्ठलाचे, पंढरपूरचे वर्ण करताना ते तल्लीन होऊन जातात. समाजमाध्यमावर त्यांचे लाखो फॉलोअर्स तयार झाले आहेत. त्यांच्या कमेंट प्रेरणा देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT