अहमदनगर - विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने समाजात बदनामी झाली. त्यातून मानसिक त्रास झाल्याने राहुरी तालुक्यातील तरुणाने अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतःला पेटून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ऋषिकेश विठ्ठल डव्हाण (वय १८ रा. बाभुळगाव ता. राहुरी) असे पेटून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पेटून घेतल्यामुळे ऋषिकेश सुमारे ७५ टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रूग्णालयात हलविण्यात आले.
१४ मे, २०२२ रोजी राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथे दोन गटात वाद झाले होते. या प्रकरणी १५ मे, २०२२ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल आहे. एका ३४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेशसह तिघांविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तर हनुमान पिल्लाजी डव्हाण यांच्या फिर्यादीवरून दुसऱ्या गटाच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ऋषिकेशवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची समाजात बदनामी झाली. याचा मानसिक त्याला मानसिक त्रास झाल्याने तो व्यतित होता. ती माहिती घेण्याच्या उद्देशाने तो न्यायालयात आला असल्याचे त्याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्याने पार्किंग केलेल्या स्वत:च्या दुचाकीतून बाटलीमध्ये पेट्रोल काढले. पेट्रोल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले. खिशातील आगपेटी काढून स्वत:ला पेटून घेतले.
दरम्यान, तरुणाने पेटून घेतल्याचे कळताच एकच धावपळ उडाली. पेटलेल्या तरुणाला माती टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. तो ७५ टक्के भाजला गेला असल्याची माहिती डॉक्टारांनी दिली. तरुण पेटल्याची माहिती मिळताच न्यायालय परिसरात बंदोबस्तावर असलेले पोलीस, भिंगार कॅम्प, कोतवाली यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय रूग्णालयातून रूग्णवाहिका मागविली. ऋषिकेशला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अहमदनगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका आठरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
काय आहे प्रकरण
बुधवारी सकाळी दुचाकीवरून अहमदनगर गाठले. येथील जिल्हा न्यायालयाचा आवारात सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रवेश केला. दुचाकी वाहन तळावर पार्किंग केली. त्यावेळी जिल्हा न्यायलयाचे दैनिक कामकाज सुरू झाले होते. खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ऋषिकेशने केला. गुन्ह दाखल झाल्याचा राग त्याच्या डोक्यात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.