animals online market esakal
अहिल्यानगर

जनावरांसाठीही सोशल मीडियावर बोली! ऑनलाइन बाजार सुरू

विनायक दरंदले

सोनई (जि.अहमदनगर) : येथील जनावरांचा बाजार कोरोना प्रादुर्भावामुळे बंद आहे. मात्र व्यापाऱ्यांनी गाय, म्हशी विक्रीचा नवा फंडा शोधून काढला असून, जनावरांची माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून ऑनलाइन बोली लावली जात आहे. गेले अनेक वर्षे गुपचूप होत असलेला हा व्यवहार आता उघड सुरू झाला आहे. नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव (ता. नेवासे) येथील उपबाजारातील जनावरांचा बाजार कोरोना प्रादुर्भावामुळे अद्यापही बंद आहे. येथे एक हजारांहून अधिक म्हशींची विक्री होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. या बाजारात परराज्यांतून व्यापारी व शेतकरी येत होते. जनावरांची बोली कापडाखाली बोटांच्या खाणाखुणा करुन केली जायची. मात्र आता हाच झाकून होत असलेला व्यवहार कोरोनामुळे उघड सुरू झाला आहे. दीड वर्षापासून निर्माण झालेल्या स्थितीमुळे हजारोंची रोजीरोटी थांबली आहे. (auction-on-social-media-for-animals too-online-market started-jpd93)

ऑफलाइन बंद असलेला जनावरांचा बाजार ऑनलाइन सुरू

घोडेगावसह चांदे, सोनई, लोहगाव, शनिशिंगणापूर, झापवाडी, शिंगवे तुकाई, वांजोळी येथील व्यापारी, दलाल व काही शेतकऱ्यांनी व्हॉट्‍स ॲप ग्रुप तयार करुन त्यावर गायी- म्हशीची छायाचित्रे, व्हिडिओ व त्यांची माहिती टाकत विक्री सुरू केली आहे. अगोदर जनावराचे छायाचित्र पाठविले जाते. एखाद्याने जनावर घेण्याची इच्छा व्यक्त केली की त्याला व्हिडिओ काॅल करून जनावर दाखविले जाते. सौदा ठरल्यावर ऑनलाइन पैशांचीही देवाण-घेवाण केली आज आहे. त्यामुळे ऑफलाइन बंद असलेला बाजार ऑनलाइन भरवला जात आहे.

घरी बसल्या बसल्या मोबाईलवर म्हशींचा सौदा होत आहे. अतिशय पारदर्शी पद्धतीने व्यवहार होत आहे. बाजारात थंगारी व दलालाच्या घुसखोरीने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. या नव्या संकल्पनेत दोन ग्राहक व विक्रेत्यांचा प्रत्यक्ष व्यवहार होत असल्याने मध्यस्थ बाजूला पडले आहेत. - संतोष सोनवणे, व्यापारी, घोडेगाव

बाजार बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या जनावरांची विक्री होत आहे. सध्या सर्वत्र कोरोना स्थिती गंभीर असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत व्यवहार कमी होत आहेत. - अनिल शेटे, शनिशिंगणापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: कसली ही नामुष्की! मनसेचा मुंबईत सुपडा साफ पण या उमेदवारांना दिला दणका..वाचा कोणाला किती मतं मिळाली?

Mumbai Vidhansabha Result 2024: मुंबईत महिलांनी पुरुषांना टाकलं मागे; आकडेवारी वाचून व्हाल थक्क!

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

Hingna Assembly Election : हिंगण्यात ‘लाडक्या बहिणी’च ठरल्या ‘गेमचेंजर’...महायुतीच्या ‘लिड’मध्ये दुप्पटीने वाढ, महाविकास आघाडी हवेत

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT