audio clip viral esakal
अहिल्यानगर

'मी साहेबाला हजारो रुपये आणून देतो!' दोन पोलिसांची ऑडिओ क्लिप व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

पाथर्डी​ (जि. अहमदनगर) : दोन पोलिस कर्मचाऱ्यांमधील आर्थिक देवाण-घेवाण या विषयावर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप आज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये, मी साहेबाला हजारो रुपये आणून देतो, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात, असे वक्तव्य एक पोलिस कर्मचारी करीत असल्याने, हे साहेब कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मी व एका कर्मचाऱ्याने सकाळीच कारवाया केल्या. तेव्हा बाकीचे कुठे होते, असा प्रश्नही या क्लिपमध्ये उपस्थित केला असल्याने, ही ऑडिओ क्लिप, कोरोनाची तीव्र साथ सुरू असतानाची असल्याचे लक्षात येते. मात्र, ती विलंबाने का व्हायरल करण्यात आली, ते समजू शकत नाही. या क्लिपमध्ये एक पोलिस कर्मचारी आपला साहेबांवरील राग दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याकडे व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे.

मी हे तुझ्याकडे नाही बोलणार तर कोणाकडे बोलणार, असा प्रश्न उपस्थित करत एक कर्मचारी म्हणतो, की मी सगळ्यांची कामे करतो. मला कोणी रिप्लाय देत नाही. मला कोणी बोलू देत नाही. मी आज साहेबांना बोलणार. आमच्या जिवावर साहेब आहेत. आम्ही पैसे गोळा करून हजारो रुपये साहेबांना आणून देतो म्हणून तुम्हाला पैसे भेटतात. मी जर ठरवले तर मी कुणालाही पैसे मिळू देणार नाही, असा दमही हा पोलिस कर्मचारी देत असल्याने, हे साहेब कोण, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. दरम्यान, या क्लिपमध्ये ज्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा आवाज आहे, त्यांतील एका कर्मचाऱ्याची बदली झाली असून, एक मात्र येथेच कार्यरत आहे.


ही ऑडिओ क्लिप मीपूर्वी ऐकली असून, या संदर्भात चौकशी करून तसा अहवाल जिल्हा पोलिसप्रमुखांकडे पाठवणार आहे.
- सुहास चव्हाण, पोलिस निरीक्षक, पाथर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT