संगमनेर (जि. अहमदनगर) : सर्वाधिक वाहन संख्या असलेले संगमनेर हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. सध्या श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कामकाजासाठी संगमनेर व अकोले पासून दूर असल्याने गैरसोयीचे आहे. त्यामुळे संगमनेरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला असून, याबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात बुधवार (ता.25) रोजी परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढोकणे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.
त्यानुसार याबाबत लवकर प्रस्ताव सादर होणार आहे. कार्यालय व वाहन चाचणी ट्रॅकसाठी आवश्यक असलेली जागा त्वरीत उपलब्ध करुन देण्याची ग्वाही मंत्री थोरात यांनी दिली आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन नोंदणीतील MH-51 हा नवीन क्रमांक मिळण्याची संगमनेरकरांची जुनी मागणी पूर्ण होण्याचे संकेत मिळाले आहेत.
तीन दशकांच्या प्रतिक्षेनंतर प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता
1987 च्या सुमारास संगमनेरात सुरु होणारे उपप्रादेशिक कार्यालय तांत्रिक कारणे व जागेच्या अनुपलब्धतेमुळे बारगळले होते. सुमारे तीन दशकांच्या प्रतिक्षेनंतर ही मागणी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. याबाबत आवश्यकता वाटल्यास शासन धोरणात बदल करण्याचे संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. तालुक्याची लोकसंख्या व वाढती वाहनसंख्या पाहता दर आठवड्याला संगमनेरात वाहन नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.