Big update on MP nilesh lanke pa rahul jhaware beating case case filed against 12 people what exactly happened  Esakal
अहमदनगर

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंच्या PAला मारहाण प्रकरणी मोठी अपडेट, १२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

अंकिता खाणे (Ankita Khane)

खासदार नीलेश लंके यांचे समर्थक अॅड. राहुल झावरे यांच्यावर पारनेर शहरातील आंबेडकर चौकात हल्ला झाला. या हल्ल्यात झावरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (ता.६) एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार लंके यांनी विजय मिळवला.

निवडणूक निकालानंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे व सुडबुद्धीचे राजकारण सुरू झाले आहे. लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

लंके यांचे पीए झावरे यांच्या कारवर पारनेर येथील आंबेडकर चौकात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. यामध्ये झावरे जखमी झाले, तसेच कारचे मोठे नुकसान झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.या प्रकरणी १२ आरोपींविरोधात पारनेर पोलिसांत भादवि कलम ३०७ आणि इतर कलमासह आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल झावरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहुल झावरे यांच्या वाहनाची तोडफोड करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल झावरे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेनंतर निलेश लंके आणि नेत्यांनी रूग्णालयात त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

या घटनेनंतर तालुक्यातील अनेक गावातून लंके व विरोधक एकत्र जमा झाले. दोन्ही बाजूंचा जमाव यावेळी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला होता. पारनेर शहरात जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ बसस्थानक चौकात व तहसील कार्यालय परिसरातील व्यावसायिकानी आपली दुकाने बंद केली होती.

पोलिस बंदोबस्त तैनात

तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नगर येथून मोठा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. आता शहरात शांतता आहे, अशी माहिती पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले.

वादाची ठिणगी गोरेगावातून ?

या वादाची सुरुवात गोरेगाव येथे झाली. तेथे बाचाबाची झाल्यानंतर पारनेर येथे आल्यानंतर झावरे यांच्यावर पारनेर येथे लंके विरोधी गटाने हल्ला केल्याची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT