P.N.Londhe  sakal
अहिल्यानगर

Rahata News: 'काम चोख असेल, तर मतदारांची विनवणी करावी लागत नाही'

They proved that work is better than mere promises in elections. लोंढे यांचे अनोखे मॉडेल; 'सकाळ'च्या विक्रेत्याने दिले राजकारण्यांना धडे.

सकाळ वृत्तसेवा

राहाता : जनसंपर्क महत्त्वाचा की विकासकामे, हा मुद्दा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा ठरला. काम चोख असेल, तर मतदारांची विनवणी करावी लागत नाही. ‘गरज असेल, तर मते द्या नाही तर, आनंदाने पेपर विकत बसू,’ मतदारांना असा सज्जड दम देणारे ‘सकाळ’चे विक्रेते कै. पु. न. लोंढे यांनी निवडणुकीचे हे असे वेगळेच मॉडेल विकसित केले होते. निवडणुकीत मतदारांना नमस्कार देखील न घालणारे वीरभद्र सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष, अशी त्यांची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली होती. निवडणुकीत दाम आणि रामरामा पेक्षा काम सरस असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.

त्यांचे हे मॉडेल राबवायला कठीण असले, तरी जिल्ह्यातील होतकरू युवा नेत्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांनी स्थापन केलेल्या वीरभद्र सहकारी दूध संस्थेचे दैनंदिन संकलन वीस हजार लिटरपर्यंत होते. दुधाला सर्वाधिक भाव अन् भेसळीला बाहेरचा रस्ता, अशी त्यांची शिस्त. संस्थेने दिलेल्या रिबेटच्या रकमेवर पंचक्रोशीतील दूध उत्पादकांची दिवाळी आनंदात साजरी होई.

संस्थेने रस्त्याच्या कडेला सोन्याची मोल असलेली एकरभर जमीन खरेदी केली. सुसज्ज इमारत उभी राहीली. आर्थिक उलाढाल वाढली. तसे बड्या राजकीय नेत्यांचे संस्थेकडे लक्ष वेधले गेले. मग लोंढेंचे पॅनल आणि बड्या राजकीय नेत्यांची छुपी रसद असलेले पॅनल अशी निवडणूक होऊ लागली. उत्पादक चिंतेत पडायचे आणि किमान मतदानाच्या दिवशी तरी मतदारांना हात जोडा, अशी विनंती लोंढेंना करायचे.

त्यावर ते मोठ्याने हसून म्हणायचे ‘कुणालाच नमस्कार करणार नाही. गरज असेल तर मते देतील. नाही तर पेपर विकत बसू.’ निवडणुकीचा निकाल लागला की ते सर्वाधिक मतांनी विजयी व्हायचे. हेतू प्रामाणिक आणि काम चोख असेल, तर प्रचार न करता देखील भरघोस मतांनी विजयी होता येते, हे या लोंढे मॉडेलने सिद्ध करून दाखवीले. ते अपराजित राहीले. पुढे त्यांनी स्वतःहून निवृत्ती स्वीकारली.

...'मीच पु. न. लोंढे'

लोंढे कोण, हे पाहण्यासाठी तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री कै. शंकरराव काळे हे त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी ते जनावरांचे शेण काढीत होते. काळे म्हणाले, ‘मला चेअरमन मिस्टर लोंढे यांना भेटायचे आहे.’ त्यावर शेणाने माखलेले दोन्ही हात जोडत ते म्हणाले, ‘मीच पु. न. लोंढे.’ या भेटीचा किस्सा त्याकाळी पंचक्रोशीत बरीच वर्षे चर्चेचा विषय झाला होता. लोंढे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT