राहुरी : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने घोषणाबाजी करीत आंदोलन केले. राहुरी येथे आज शुक्रवारी (ता. ८) कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे, तालुकाप्रमुख विजय ढोकणे, उपप्रमुख सचिन म्हसे, युवा सेना तालुकाप्रमुख रोहन भुजाडी, गणेश खेवरे, पोपट शिरसाठ, कैलास शेळके, अशोक खेवरे, सोमनाथ फुलारे, अवधूत सोलट, उमेश कवाणे, सुनील शेलार, सतीश माने, शहाजी वराळे, महेश औटी, राजेंद्र सातभाई यांनी आंदोलनात भाग घेतला.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली भाजप नेते सोमय्या पिता-पुत्राने सामान्य जनतेकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. केंद्रातील भाजप सरकारने ही युद्धनौका भंगारात काढली. सोमय्या पिता-पुत्राने युद्धनौका वाचविण्याची भावनिक साद घालून गोळा केलेले कोट्यवधी रुपये हडप केले. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी शिवसैनिक आंदोलनकर्त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.