Prakash chitte esakal
अहिल्यानगर

हिंदूंच्या सणाला वीजपुरवठा खंडित का केला जातो? प्रकाश चित्ते

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरात हजरत सय्यद बाबा यांचा उरूस, तर त्यापाठोपाठ येणाऱ्या रामनवमीनिमित्त मोठी यात्रा भरते. उरुसच्या काळात महावितरणने सदर भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवला होता. मात्र, हिंदूंच्या सणाला वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक तासापासून येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

हजरत सय्यद बाबा यांचा उरूस शनिवारी (ता. ९) संपला. त्यानंतर रविवारी (ता. १०) पासून रामनवमी उत्सवास सुरुवात झाली. मात्र, या काळात सायंकाळी महावितरणकडून सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना (Corona) काळामुळे यात्रा उत्सव साजरा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले आहेत. मात्र, संध्याकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचाच फायदा घेऊन चोरट्यांकडून महिलांच्या दागिने, पाकीटमारीच्या घटना घडत आहेत. तसेच पाळण्यावाल्यांकडूनही जादा दराची आकारणी केली जात असल्याचा आरोप सातत्याने सुरू आहे. मात्र, याकडे सर्वच प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

याचाच उद्रेक होऊन आज भाजपच्या वतीने येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात चित्ते यांच्यासह मनोज हिवराळे, सोमनाथ कदम, सुनील पिंगळे, सिद्धार्थ साळवे, सोमनाथ पतंगे, महेश विश्वकर्मा, बाळासाहेब गाडेकर, रमेश सातपुते, रितेश काटे, सागर मलिक, डॉ. दिलीप शिरसाठ, सतीश शरणागत, बबन जाधव, अर्जुन करपे, मच्छिंद्र अहिरे, उमेश पवार, अशोक थिटे, प्रसाद सातोरे, हरीश शिंदे, अशोक लोखंडे, योगेश व्यवहारे आदी सहभागी झाले आहेत. हजरत सय्यद बाबा उरुसानिमित्त भरणाऱ्या संदला महावितरणकडून वी पुरवठा करण्यात आला. मात्र, हिंदूंच्या यात्रा उत्सवाला महावितरणने भारनियमन कसे सुरू केले, याच्याच निषेधार्थ हे आंदोलन सुरू असल्याचे चित्ते यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT