big bazaar esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : बिग बाजारवर 'कारवाई'चा डबल धमाका!

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : कोरोना प्रादुर्भाव (coronavirus) आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवार आरोग्यसेवा सोडता सर्व सेवा व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र नगर शहरातील बिग बाजार सुरू असल्याने महापालिकेच्या दक्षता पथकाने २५ हजार रुपयांचा दंड केला. महापालिकेच्या कारवाई पूर्वीच पोलिस पथकाने बिग बाजारला पाच हजार रुपयांचा दंड केला होता. तरीही मॉल बंद न झाल्याने महापालिकेच्या पथकाने पुन्हा दंड केला. (broke-rules-of-weekend-lockdown-action-on-Big-bazaar-jpd93)

बिग बाजारवर कारवाईचा डबल धमाका

महापालिकेच्या पथकाला बिग बाजार (big bazaar) रविवार असूनही सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दक्षता पथक (शहर) प्रमुख शशिकांत नजान व त्यांच्या पथकातील सहायक आदींनी अचानक बिग बाजारला भेट दिली. मॉलचा दरवाजा उघडा दिसून आला. पथक तातडीने मॉलमध्ये गेले. महापालिकेचे पथक पाहताच बिग बाजारमध्ये घबराटीचे वातावरण पसरते. महापालिकेचे पथक येण्यापूर्वी अर्धा तास आधीच पोलिसांचे पथकही बिग बाजारमध्ये आले होते. त्या पथकाने दंड करूनही मॉल सुरू होता. त्यामुळे पथकाने आतमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांची नोंद घेऊन बिग बाजारच्या व्यवस्थापकांना २५ हजार रुपयांचा दंड केला.
महापालिकेने सहा दक्षता पथके नियुक्त केले आहेत. या पथकांनी स्थानिक नागरिकांवर व अस्थापनांवर कारवाई केल्यास राजकीय दबाव येतो. तसेच अनेकवेळा नागरिक हल्लाही करतात. त्यामुळे या पथकाला पोलिस संरक्षणाची गरज आहे. काही दिवसांपर्यंत या पथकांना पोलिस संरक्षण मिळाले. मात्र आता पोलिस संरक्षण मिळत नसल्याने कारवाईला मर्यादा पडत असल्याची चर्चा आहे.




चाचणी प्रमाणपत्रामुळे कारवाई टळली
कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करत एका मंगल कार्यालयात क्रीडा स्पर्धा सुरू होती. पथकाला क्रीडा स्पर्धा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक मंगल कार्यालयात पोचले. स्पर्धा आयोजकांनी सर्व खेळाडूंसह उपस्थितांची कोरोना चाचणी झाल्याचे प्रमाणपत्रच सादर केल्याने कारवाई टळली.


मास्क न लावणाऱ्या ६० जणांवर करवाई
महापालिकेच्या नजान प्रमुख असलेल्या दक्षता पथकाने आज शहरात विना मास्क फिरणाऱ्या ६० नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्या कडून १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT