vikhe patil  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : औद्योगिक वसाहतींमुळे तरुणांना रोजगार - राधाकृष्ण विखे

संगमनेर येथे आयोजित पंतप्रधान मोदी दौऱ्याच्या नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर - जिल्‍ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार निर्माण करण्‍यासाठी केंद्र व राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने नगर, शिर्डी आणि सुपे येथील औद्योगिक वसाहतींच्या विस्‍ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील एक ते दीड वर्षात शिर्डी येथे विकसित होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधून किमान १० हजार युवकांना रोजगार उपलब्‍ध करून देण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर येथे आयोजित पंतप्रधान मोदी दौऱ्याच्या नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी बापूसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख, वसंतराव गुंजाळ, सतीष कानवडे, श्रीराम गणपुले, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे शहराध्‍यक्ष सोमनाथ कानकाटे, ज्ञानेश्‍वर कर्पे, जावेद जहागीरदार, अमोल खताळ, राम जाजू, किशोर नावंदर, राजेंद्र सांगळे, सदाशिव थोरात, राजेंद्र सांगळे, रवींद्र थोरात, शौकत जहागीरदार, रऊफ शेख, प्रशांत वामन आदी उपस्थित होते.

एक रुपयात पीकविमा योजनेप्रमाणे पशुधनासाठीही विमा योजना सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. वंदे भारत एक्स्प्रेस व समृद्धी महामार्गाच्या पायाभूत सुविधांचा उपयोग करून जिल्‍ह्यातील तरुणांना स्‍थानिक पातळीवरच रोजगार निर्माण करणाचा प्रयत्‍न आहे. शिर्डीतील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी ५०० एकर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यात आयटी पार्कसारखे मोठे प्रकल्प यावेत यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी सभेच्‍या प्रचारार्थ तयार करण्‍यात आलेल्‍या रथाचा शुभारंभ विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

निळवंडे धरणााचे ;लोकार्पण होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणस्‍थळी जाऊन धरणाचे लोकार्पण व जलपूजन करणार आहेत. प्रशासनाने धरण स्‍थळावर केलेल्‍या तयारीची पाहणी मंत्री विखे पाटील यांनी केली. माजी आमदार वैभव पिचड, शिवाजीराव धुमाळ आदींसह जलसंपदा, महसूल, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT