chief accountant arrested for taking bribe found assets worth crores of rupees  Sakal
अहिल्यानगर

लाचखोर मुख्य लेखाधिकाऱ्याकडे सापडले कोट्यावधीचे घबाड

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यास ठेकेदाराचे बिल देण्याच्या बदल्यात 20 हजारांची लाच मागितल्यावरून नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. मानकर यांच्या घराची झडती घेतली असता 11 लाख 50 हजारांची रोख रक्कम, 540 ग्रॅम सोन्याचे दागिने, दीड किलो चांदी आणि तीन फ्लॅटची कागदपत्रे अशी कोट्यावधी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे.

प्रवीण मानकर याला लाचेची मागणी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. मानकर यांचे कुटुंबीय पुणे येथील फ्लॅट नंबर 102, फ्यांटसी, उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी येथे राहत आहेत. मानकर यास अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने त्याच्या पुणे येथील घराची झडती घेतली. त्याच्या पत्नीकडे या रोख रक्कम, दागिने आणि फ्लॅटच्या कागदपत्रांबद्दल उत्पन्नाचा स्त्रोत विचारला असता, समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाहीत. ही रोख रक्कम, दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. मानकर यास न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT