झाडांच्या बुंध्यांजवळ दोन-तीन फूट खड्डे घेऊन, आग लावून त्यावर मातीचा पातळ थर द्यायचा. झाडाचा बुंधा आपोआप पेट घेऊन झाड चौदा-पंधरा तासांनी कोसळते.
नेवासे : झाडे जाळून कोळशाची विक्री व अवैध वृक्षतोड करणाऱ्या टोळ्यांनी सध्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मोठमोठ्या झाडांना लक्ष्य केले आहे. आदल्या रात्री झाडांच्या बुंध्यांना आग लावून, दुसऱ्या रात्री ती पाडून लाकडासह कोळसा विकण्याचा उद्योग सध्या नेवासे तालुक्यात जोरात सुरू आहे. नेवासे-शेवगाव रस्त्यावर मोठ्या झाडांना लावलेल्या आगीमुळे हा प्रकार उजेडात आला आहे.
राज्य महामार्गावरील वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम व वन विभागावर, तर राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी वरील दोन्ही विभागांसह नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाची आहे. मात्र, हे विभाग एकमेकांकडे अंगुलिनिर्देश करीत आहेत. यांच्याच मूकसंमतीने हा सर्व प्रकार सुरू असल्याने, जबाबदार धरायचे कुणाला आणि तक्रार करायची कुणाकडे, हा प्रश्न आहे. (Coal smuggling in Nevasa taluka)
वृक्षांच्या कत्तलीचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतो. श्रीरामपूर- नेवासे- शेवगाव या महामार्गावर गेल्या वर्षभरात ६३ झाडांचे बुंधे जाळण्याचे, तसेच वृक्षांच्या मुळाशी व सालीवर कुऱ्हाडीने घाव घालून ती वळविण्याचे ‘प्रयोग’ १०७ झाडांवर करण्यात आले. बिगरभांडवली, कमी कष्टात जास्त पैसा मिळत असल्याने या धंद्यात अनेक टोळ्या सक्रिय आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार घातक असून, यासाठी वृक्ष पेटविणे व वृक्षतोडीला शासनाने वेळीच पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.
असा होतो झाडांवर ‘प्रयोग’
झाडांच्या बुंध्यांजवळ दोन-तीन फूट खड्डे घेऊन, आग लावून त्यावर मातीचा पातळ थर द्यायचा. झाडाचा बुंधा आपोआप पेट घेऊन झाड चौदा-पंधरा तासांनी कोसळते. रातोरात त्याची कत्तल करून ते पसार केले जाते. झाडाने जास्त पेट घेतल्यास ते जवळच एक खड्डा घेऊन पुरले जाते. त्यापासून कोळसा निर्माण केला जातो.
बिगारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, त्या जागा अद्यापही रिक्तच आहेत. त्यामुळे रस्त्यांसह हद्दीतील वृक्षांची देखभाल करण्यासाठी मजूर नाही.
- रमेश खामकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम, नेवासे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील वृक्षतोड थांबविण्याची व झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे.
- मुसा सय्यद, वनरक्षक, नेवासे
(Coal smuggling in Nevasa taluka)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.