अहमदनगर : काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बारा जागांवरील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्यासह पदाधिकारी मुलाखतीसाठी उपस्थित होते. शिर्डीत घोषणाबाजी झाली. मात्र, नगरमध्ये शांततेत प्रक्रिया पार पडली.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते, ते अर्ज प्रदेश कार्यालयाकडे आल्यानंतर नगर जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांची विधानसभानिहाय यादी पाठवण्यात आली. या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान जिल्हास्तरावर घ्याव्यात, असे निर्देश होते.
महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनिथला यांच्या निर्देशानुसार आणि प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने नगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी शुक्रवारी दिवसभर दोन्ही मतदारसंघांत मुलाखती घेतल्या.
काँग्रेसकडूनही लढणाऱ्या इच्छुकांची मोठी संख्या आहे. मुलाखतींना मिळालेला प्रतिसाद चांगला होता. मुलाखतींबाबतचा गोपनीय अहवाल १० ऑक्टोबरपर्यंत प्रदेश कार्याकडे सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अकोले - सतीश भांगरे, शिर्डी - पंकज लोंढे, एकनाथ गोंदकर, संभाजी चौगुले, प्रभाताई घोगरे, श्रीरामपूर - आमदार लहू कानडे, प्रदेश युवकचे हेमंत ओगले, विलासराव खाजेकर, ॲड. प्रकाश संसारे, डॉ. चेतना बनकर आणि युवराज बागूल. नेवासे - सचिन शेटे, संभाजी माळवदे आणि दिलीप वाकचौरे. संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे इच्छुक असल्याने तेथे कोणत्याही उमेदवाराने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली नाही.
नगर शहरातून किरण काळे इच्छुक आहेत. मंगल भुजबळ आणि मोहसीन शेख यांनीही मुलाखती दिल्या आहेत. श्रीगोंदा विधानसभेसाठी घनश्याम शेलार यांचा एकमेव अर्ज होता. कर्जतमध्ये ॲड. कैलास शेवाळे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्या मतदारसंघात मंगल भुजबळही उत्सुक आहेत. इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.