Pooja Khedkar esakal
अहिल्यानगर

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी?

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र हे मूळ रहिवासी असलेल्या जिल्ह्यातूनच घ्यावे लागते. त्यांनी अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयातून हे प्रमाणपत्र घेतले का? याची वरिष्ठ कार्यालयाकडून पडताळणी केल्यावरच निष्पन्न होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साहेबराव डवरे यांनी दिली.

सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे भालगाव (ता. पाथर्डी) येथील रहिवासी आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकरी झाली. प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथे नियुक्ती झाली होती. खासगी वाहनावर लाल दिवा लावणे, भारत सरकार असे स्टीकर लावणे, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील फर्निचर हस्तांतरीत करणे, आदी नियमबाह्य वर्तन त्यांनी केले होते.

पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला. त्यानंतर त्यांची वाशिम जिल्ह्यात बदली झाली. पूजा यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखल्यावरून वादंग निर्माण झाले आहे. खेडकर कुटुंबीय हे पाथर्डी तालुक्यातील रहिवासी असल्याने या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा आहे.

रहिवासी असलेल्या ठिकाणीच दाखला

ज्या जिल्ह्यातील रहिवासी, त्याच ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र काढावे लागते. जिल्हा शासकीय रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, दिव्यांग असलेल्या आजाराचे विभाग प्रमुख डॉक्टर यांच्या समितीमार्फत हे प्रमाणपत्र दिले जाते.

जुन्या पद्धतीनुसार दिव्यांग प्रमाणपत्राचे रेकॉर्ड हे लेखी स्वरूपात ठेवले जात होते. वरिष्ठ कार्यालयाकडून एखाद्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचा आदेश आल्यानंतर त्या प्रमाणपत्रावरील जावक क्रमांक आणि तारखेच्या आधारेच प्रमाणपत्राची पडताळणी करणे शक्य होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

SCROLL FOR NEXT