Corona killed dozens of people at Sangamnare 
अहिल्यानगर

संगमनेरात कोरोनाने घेतले एक डझन बळी

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः चार दिवसांपूर्वी संगमनेर शहराच्या मध्यवर्ती भागातील सय्यदबाबा चौक भागात कोरोना बाधित झालेल्या 70 वर्ष वयाच्या ज्येष्ठ व्यक्तीचा आज सकाळी नाशिक येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यामुळे संगमनेर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 12 झाली आहे.

संगमनेरच्या सय्यदबाबा चौकातील या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची बाधा झाल्याची बाब 3 जुलै रोजी उघडकिला आली होती. त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना प्रकृती अधिकच खालावल्याने आज सकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

नवीन नियमानुसार नातेवाईकांनी मागणी केल्यास मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्याची तरतूद असल्याने, पार्थिवातून संसर्ग होणार नाही याची पूर्ण काळजी घेत, नाशिक जिल्हा प्रशासनाने रुग्णाचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले होते. याबाबतचे संपूर्ण विवरण स्थानिक प्रशासनाला कळवण्यात आले होते.

आज सकाळी साडे दहाच्या सुमारास नियमांच्या अधिन राहून आरोग्य, पोलिस, पालिका व महसुल अधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्यांच्या कुटुंबातील मोजक्या लोकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

संगमनेर तालुक्यातील कुरण या प्रतिबंधीत गावातील बाधीतांच्या संपर्कातील हाय रिस्क प्रवर्गातील 36 जणांचे, यवतमाळला लग्नासाठी गेल्याने, कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या पठार भागातील पूर्ण प्रतिबंधीत असलेल्या पेमरेवाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील 10 तसेच शेडगाव, पळसखेडे व संगमनेर शहरातील प्रत्येकी 2 अशा सुमारे 60 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची दिलासादायक माहिती प्रशासनाने दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT