श्रीरामपूर : येथील शेती व पाणी प्रश्नांबाबत एप्रिल २०१७ मध्ये शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुक्यातील संगमनेर रस्त्यावरील मुठेवडगाव शिवारातील पाटबंधारे कार्यालयात आसूड आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी अधिकाऱ्यांना व त्यांच्या खुर्चीला काळे फासले होते.
या प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी मंत्री आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्यासह १९ आरोपींविरुद्ध श्रीरामपूर येथील न्यायालयात काल आरोप निश्चित करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील, प्रहार पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेती व पाणीप्रश्नाबाबत पाटबंधारे कार्यालयात १८ एप्रिल २०१७ रोजी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी अधिकारी आणि खुर्चीला काळे फासल्याने पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ लिपिक दिलीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाटील, आमदार कडू, कालिदास आपेट, अजय बारस्कर, बाळासाहेब पटारे, अनिल औताडे, युवराज जगताप, भिकचंद मुठे, डॉ. शंकर मुठे, रूपेश काले, रमेश मुठे, रघुनाथ मुठे, भाऊसाहेब मुठे, शिवाजी मुठे, संजय गवारे, चांगदेव मुठे, पराजी शिंदे, भास्कर शिंदे, विलास कदम आदी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी आंदोलकांना जामीन मंजूर झाले होते.
श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आंदोलकांविरूद्ध आरोप निश्चित करण्यात आले. पुढील सुनावणी १५ ऑक्टोबरपासून होणार असल्याची माहिती ॲड. बाबासाहेब मुठे यांनी दिली.
रघुनाथदादांकडून पदाधिकाऱ्यांशी चर्चा
सुनावणीवेळी पाटील व कडू हे उपस्थित होते. सुनावणीनंतर कडू हे न्यायालयातून निघून गेले, तर पाटील यांनी येथील शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.