कारवाई  sakal
अहिल्यानगर

Crime news : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;व्यापाऱ्याला लुटणारी टोळी पकडली

सराईत गुन्हेगारांच्या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : मुळाडॅम फाट्याजवळ नगर-मनमाड महामार्गावर एका व्यापाऱ्याचे वाहन अडवून, चालकासह अपहरण व मारहाण करून १० लाख २० हजारांचा मुद्देमाल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. दोन जण फरार आहेत.

व्यापारी अनिल रामचंद्र घाडगे (वय ४८, रा. मल्हारवाडी, ता. राहुरी) सोमवारी (ता. १२) रात्री नऊ वाजता चारचाकी वाहनातून नगर वरून राहुरीच्या दिशेने चालले होते. मुळाडॅम फाट्याजवळ पवार पेट्रोल पंपासमोर पाठीमागून आलेल्या कार चालकाने वाहन आडवे लावले. कारमधून चार जण तोंडाला रुमाल बांधून उतरले.

त्यांनी हातातील कत्तीने घाडगे यांच्या वाहनाची काच फोडली. त्यांना व त्यांच्या चालकाला वाहनातून खाली ओढून डोळ्यावर पट्टी बांधून गाडीत बसविले. त्यांना अज्ञातस्थळी नेऊन कमरेच्या पट्ट्याने व अज्ञात ठणक वस्तूने मारहाण केली. बॅगमध्ये ठेवलेले साडेनऊ लाख रुपये, घाडगे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी व एक तोळा वजनाची अंगठी असा १० लाख २० हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून चोरटे पसार झाले. व्यापारी घाडगे व त्यांच्या चालकाला वांबोरी घाटाजवळ सोडून दिले.

याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात घाडगे यांच्या फिर्यादीवरून अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. त्यांना घटनेतील आरोपी काल (शुक्रवारी) सावळीविहिर फाटा (शिर्डी) येथे येणार असल्याची गोपनीय खबर मिळाली.

योगेश खरात (वय २४, रा. भोजडे चौक, कोपरगाव), अनिल मालदोडे (वय ३०, रा. पिंपळवाडी, माऊलीनगर, शिर्डी), गुड्डू ऊर्फ सागर मगर (वय २१, रा. हनुमानवाडी, कान्हेगाव, ता. कोपरगाव), सोनू ऊर्फ सोन्या पवार (वय २५, रा. हॉलीडे पार्क शेजारी, शिर्डी) अशा चार जणांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी धनंजय काळे (रा. रामवाडी, सवत्संर, ता. कोपरगाव), मयुर गायकवाड (रा. इंदीरानगर, ता. कोपरगांव) अशी पसार इसमांची नावे सांगितली.

आरोपींनी व्यापारी घाडगे यांच्या लुटमारीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील आणखी चार साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार, किरण कोळपे (रा. विळद, ता. नगर), आकाश शिंदे (रा. पाण्याचे टाकीजवळ, विळद), महेश विठ्ठल वाघ व सोनू ऊर्फ शुभम ठोंबे (दोघेही रा. खांडके, ता. नगर) यांना पथकाने ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून घाडगे यांच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील २,०१,००० रुपये, १,२०,००० हजारांची सोन्याची साखळी, गुन्हा करण्यासाठी वापरलेली सात लाखांची कार, शंभर रुपयांचा एक रामपुरी चाकू, आरोपींचे १,३५,००० हजारांचे मोबाईल फोन असा एकूण १०,३६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT