काळे-कोल्हे 
अहिल्यानगर

ग्रामीण रुग्णालयावरून रंगला काळे-कोल्हेंमध्ये श्रेयवाद

मनोज जोशी

कोपरगाव ः शहरातील मध्यवस्तीत सहा एकर क्षेत्रात विस्तारलेल्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णलयात रूपांतरीत करण्यासाठी मान्यता मिळाली. दरम्यान भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विद्यमान आमदार आशुतोष काळे या दोघांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे श्रेणीवर्धनास मंजुरी मिळाली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे श्रेयवादावरून दोघे पुन्हा आमने-सामने आले आहेत.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, तीस खाटांचे अद्ययावत इमारतीसह रुग्णालय, कर्मचारी निवासस्थान बांधकाम पूर्ण झाले आहे. (Dispute between Kale-Kolhe in Kopargaon)

या रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रूग्णालय करण्यात यावे यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचेकडे पत्रव्यवहार केला होता. सन 2015 पासून या कामाचा पाठपुरावा सुरू होता. सन 2018 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले होते.

सन 2011च्या जनगणनेवर आधारीत आरोग्य संस्थाचा जोड बहृत आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. कोपरगाव ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी निकषांनुसार जोडबहृत आराखडयामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार आयुक्त, आरोग्य सेवा संचलनालय, मुंबई यांनी प्रस्तावास मान्यता दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनीदेखील आपल्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्याचे म्हंटले आहे. त्यांनी पत्रकात म्हंटले कि, विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या दृष्टीने प्रयत्न होते. कोरोनाच्या संकटात नागरिकांनी खूप दु:ख सोसले त्या दृष्टीने प्रयत्न करतांना १०० बेडचेच उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे असा आग्रह लावून धरला होता.

पाठपुराव्याची योग्य दखल व केलेल्या आग्रहातून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. केवळ दीडच वर्षात जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता होत असल्याचे आत्मिक समाधान मिळत आहे. उर्वरित वचनांची पूर्तता करण्यासाठी यापुढेही बांधील असल्याचे आमदार काळे पुढे म्हणाले. नागरिकांना मात्र एकाच छताखाली आयसीयूसारखी चांगली दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. (Dispute between Kale-Kolhe in Kopargaon)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT