कर्जत (जि.अहमदनगर) : तालुक्यातील मिरजगाव (mirajgaon) येथील सीना परिसर नागरी सहकारी पतसंस्थेत तीन कोटी एकवीस लाखांचा अपहार झाला आहे.
तीन कोटी एकवीस लाखांचा अपहार
दिलेल्या फिर्यादीनुसार, संस्थेत १९९६ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान इक्बाल जमादार शेख हे व्यवस्थापक होते. व्यवस्थापक म्हणून सोने तारण कर्ज लॉकरच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. दत्तात्रय ऊर्फ आबा प्रकाश सुतार हे सन २००० पासून क्लार्क या पदावर कार्यरत होते. संस्थेच्या सर्व कामकाजाची जबाबदारी या दोघांवर होती. तसेच लेखापरीक्षणासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांसह सर्व जबाबदारी त्यांच्याकडेच होती. याबाबत व्यवस्थापक इक्बाल जमादार शेख, सचिव दत्तात्रय ऊर्फ आबा प्रकाश सुतार व कर्जदार इंद्रकुमार शंकरराव धोंगडे (सर्व रा. मिरजगाव) यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष एकनाथ खेतमाळीस यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत सांगितले, की इक्बाल शेख हयात नाहीत. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हे प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहे.
सोने तारणच्या ११ बॅगा कर्ज न भरताच नेल्या
व्यवस्थापक शेख यांच्या निधनानंतर किरण पाराजी काळे यांच्याकडे व्यवस्थापकपदाचा कार्यभार देताना हा गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला. जिल्हा बँकेत असलेल्या पाच लॉकरमध्ये सोने तारणच्या काही बॅगा कमी आढळल्या. तसेच लेखापरीक्षण अहवाल १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च ३०२१ पर्यंतच्या, ३० जुलै २०२१ रोजी लेखापरीक्षक टी. वाय. कोरे यांनी जाहीर केलेल्या अहवालात संस्थेचे कर्जदार इंद्रकुमार धोंगडे यांच्याकडे एक कोटी कर्ज असून, लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या ११ बॅगा मिळून आल्या नाहीत. याबाबत धोंगडे यांना संस्थेने गुन्हा दाखल करण्याचे सांगितल्यावर त्यांनी व्यवस्थापक शेख व क्लार्क सुतार यांच्याशी मैत्री असल्याने सोने असलेल्या बॅगा घेऊन गेलो, असे सांगितले. त्याने या कर्जापोटी २२ मार्च ते २० जुलै २०२१पर्यंत संस्थेत एकोणचाळीस लाख रुपये रक्कमही भरली. मात्र, नंतर त्याने उर्वरित रक्कम भरण्यास नकार दिला. याबाबत फिर्यादीवरून वरील तिघांच्या विरोधात तीन कोटी एकवीस लाख चार हजार नऊशे दोन रुपयांच्या अपहारप्रकरणी कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.