श्रीगोंदे (जि. नगर) : शेतीत कष्टासोबतच योग्य व्यवस्थापन केल्यास हमखास पैसे मिळतात, हे लोणी व्यंकनाथ येथील जगताप कुटुंबाने दाखवून दिले. तेरा एकर द्राक्षपिकातून दर वर्षी पन्नास लाखांचा नफा घेणाऱ्या या कुटुंबाने आता अडीच एकरांवर कारल्याचे देखणे पीक घेतले. द्राक्षे काढल्यानंतर त्याच्या स्टेजिंगचा योग्य उपयोग करीत घेतलेले कारले त्यांना कष्टाचे व नियोजनाचे पैसे मिळवून देणारे ठरणार आहे.
लोणी व्यंकनाथ येथील सचिन व नितीन जगताप हे बंधू आधुनिक शेतीत गुंतलेले आहेत. पत्नी ताई व पल्लवी या त्यांना शेतीत मदत करतात. जगताप यांच्याकडे तेरा एकर द्राक्षबाग आहे. त्यातून त्यांचा वर्षाला अर्धा कोटीचा नफा आहे. मात्र, उत्पन्न मिळविण्यासाठी त्यांची जिद्द, कष्ट आणि नियोजनाला तोड नाही. घरातील महिला चौदा तास शेतात राबतात. त्यामुळे त्यांची शेती सजली आहे.
द्राक्षबागेतून थेट कारल्याकडे कसे वळलात, यावर सचिन जगताप म्हणाले, की लावलेली द्राक्षे काढल्यानंतर त्याच स्टेजिंगवर दुसरे काही पीक घेण्याचा विचार केला. कारल्याची सहा हजार रोपे विकत घेत, अडीच एकरांत लागवड केली. रोपांसाठीच पंचवीस हजार रुपये खर्च केले. पहिल्या स्टेजिंगला कारल्याची वाढ होण्यासाठी नायलॉन दोऱ्याचा आधार दिला. त्यामुळे आता वरच्या बाजूने कारली पसरली असून, शेतात पूर्ण आच्छादन झाले आहे. याचा फायदा कारल्याच्या उत्पादनवाढीवर, म्हणजे पर्यायाने उत्पन्नवाढीला होत आहे. ताई जगताप यांनी, चार दिवसांना साडेचार टनांच्या आसपास कारली निघत असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.