Former District Bank Chairman Sitaram Gaikar a senior co operative leader from Ahmednagar district joined the NCP along with his colleagues.jpg 
अहिल्यानगर

थांबा थोडं, तुमच्या जिल्हा बँकेतील गडबडी बाहेर काढतो, अजितदादांच्या इशाऱ्याने सहकार 'अलर्ट'

सकाळ वृत्तसेवा

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील विकासकामे करुन तालुक्याचा कायापालट मधुकर पिचाडांना पाहून केला नाही. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमय होता व तालुक्यातील जनता पवार साहेबांवर प्रेम करत होती म्हणून केला असल्याचे सांगत जिल्हा बँकेत कोणी गडबडी केल्या मला माहीत आहे. थोडे दिवस जाऊ द्या चांगली गमंत काढतो, असा टोला पिचड यांचे नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंञी ना.अजित पवार यांनी लगावला.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मंगळवारी दुपारी १२ वा राज्याचे उपमुख्यमंञी ना.अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, पालकमंञी ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील सहकारातील जेष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनी आपल्या सहका-यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी कारखान्याचे विद्यमान संचालक, अमृतसागर दुध संघाचे संचालक, मार्केट कमिटीचे सभापती, संचालक, नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष व काही नगरसेवक आणि तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारिणी पक्षात प्रवेश केला.

यावेळी अकोलेचे आमदार डॅा.किरण लहामटे, आमदार बाबासाहेब पाटील, घनश्याम शेलार, युवा जिल्हा बँक संचालक अमित भांगरे, राष्ट्रवादी अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे, जिल्हा युवक अध्यक्ष कपिल पवार, जेष्ठ नेते अशोकराव भांगरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष बबन वाळुंज, जेष्ठ नेते बी.जे.देशमुख, अकोले तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, जिल्हाउपाध्यक्ष प्रा.सुरेश खांडगे, प्रा.संपत नाईकवाडी आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ना. पवार म्हणाले की, जवळचे सहकारी सोडून दूर गेल्याने करमत नव्हते, माञ आता अकोलेकडे बघितले तर निश्चित बरे वाटते. जीवाभावाची माणसं इकडे तिकड गेली होती. आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणतात ना दिवसभर कुठंही फिरत बसलं तरी सायंकाळी चावडीवरच येणार तसे आहे. माञ आता गायकर साहेब आता इथून पुढे कुठे जाण्याचा विचार करु नका. तुम्हाला आता तालुका राष्ट्रवादीमय करुन थांबायचे नाही तर पूर्ण अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण वैभव पिचडांना खूप समजावले. तुम्ही तरुण आहात चूक करु नका. माञ त्यांनी मला हो म्हणाले आणि नको तो निर्णय घेतला मग आपल्याकडे काट्याने काटा काढायची पद्धत आहे. त्यानुसार आपण तालुक्यात पाहणी करून आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने डॅा.किरण लहामटे ना उमेदवारी दिली. त्यावेळी तालुक्यात प्रचाराला सभेला येताना इकडे तिकडे गेल्यावर बोलावे लागले. आता तालुक्याच्या विकासाचा बॅकलॅाग भरून काढायचा आहे. आता नवीन प्रवेशावर हलक्या कानाचे होऊ नका, नव्या जुन्याचा मेळ घालत, नवी-जुनी, तरुण व अनुभवी अश्या लोकांना विविध संस्थेत संधी द्यावी. विकासाची कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच केली जातात.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील म्हणाले, ज्याच्या सातबारा उता-यावर राष्ट्रवादी नाव आहे ते सीताराम गायकर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले होते असे कधी वाटलेच नाही. हिमालयासारखे उत्तुंग नेतृत्व असलेले शरद पवार यांचे नेतृत्वाला राज्यातील जनतेने साथ देत ज्यांनी आपले सरकार येणार नसल्याचे भाकित करत पक्ष सोडला. त्यांना धडा देत राज्यात आपले तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आणले. याच पक्ष कार्यालयात दिड ते दोन वर्षापूर्वी एक वेळ अशी होती, इथे कोणी थांबायला तयार नव्हते. माञ आता पुन्हा वरदळ सुरु झाली आहे. शरद पवारांचे नेहमी बेरजेचे राजकारण राहीले महाराष्ट्रात पवारांवर प्रेम करणाऱ्याची संख्या खूप आहे. 

आम्ही पक्ष पुन्हा उभा करतोय बळकट करतोय. तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवण्याचे काम आमदार डॅा.लहामटे राज्याचे उपमुख्यमंञी ना.अजित पवार, पालकमंञी ना.हसन मुश्रीफ व आपल्या व सरकारमधील मंञ्याचे माध्यामातून करत आहे. मागील काळात भाजपाचे सरकार असताना आंदोलन मोर्चे करुन जी प्रश्न व विकासकामे झाली नाही ती आज आपले सरकार आल्याने पूर्ण होत आहे. जिवाभावाचा नेता आज पक्षात आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. गायकर साहेब नगर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी आपली मदत होईल. आपण अकोले विधानसभेसह संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनाही ताकद देण्याचे काम करावे अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

ना.हसन मुश्रीफ म्हणाले, कुटुंबातील एखादा मुलगा रूसून गेला व तो पुन्हा आल्यासारखे आहे. विधानसभेवेळी मा.शरद पवारांना त्याचे जवळचे शिलेदार सोडून गेले तेव्हा फार मोठ्या वेदना झाल्या. त्यात राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वेदना झाल्या. त्याची फेड सर्व सामान्य माणसांनी निवडणुकीत दाखवून दिली. त्याचे उत्तम उदाहरण अकोले विधानसभा मतदार संघातील आ.लहामटे आहेत.
              
यावेळी सहकारातील जेष्ठ नेते सीताराम गायकर यांचे समवेत व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक कचरुपाटील शेटे, गुलाबराव शेवाळे, रामनाथ बापू वाकचाैरे, प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, भास्कर बिन्नर, बाळासाहेब ताजणे, प्रतापराव देशमुख, आनंदराव वाकचाैरे, मार्केट कमेटीचे सभापती पर्बतराव नाईकवाडी, संचालक सुधीर शेळके, मुरलीधर ढोन्नर, रोहिदास भोर, पुंजा पाटील वाकचाैरे, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर, विजय अस्वले, निवृत्ती कचरे, दुध संघाचे संचालक भाऊ पाटील नवले, विठ्ठलराव चासकर, बाळासाहेब भोर, शरदराव चाैधरी, विठ्ठल डुंबरे, रविद्र हांडे, सुभाष बेनके, रेखा नवले, सोपान मांडे, भाऊसाहेब काळे, प्रकाश नाईकवाडी, धोडीभाऊ चव्हाण, दत्ताञय भोईर (गुरुजी), पुंजा वाकचाैरे, लक्ष्मण कोरडे, सुभाष वायाळ, विकास शेटे, सचिन दराडे, (विद्यमान उपसरपंच समशेरपुर), राजेद्र लोखंडे, चंदर शिंदे, अनिल कोळपकर, नवनाथ गायकवाड, शिवसेनेचे - कैलासराव शेळके, अप्पासाहेब आवारी भाऊसाहेब रक्टे, भाऊसाहेब देशमुख प्रशांत देशमुख, किसन शेटे, वसंत धुमाळ, अशोक नवले, भास्कर अरोटे, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले.

आता राष्ट्रवादी काँग्रेसची मेगा भरती सुरु

विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेत मेगाभरती केली होती. त्यात सुरवतीलाच राज्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी मंञी मधुकरराव पिचड यांनी भाजपात प्रवेश करुन अकोलेतून सुरूवात केली. त्याचीच परतफेड करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याचे नेते उपमुख्यमंञी ना अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली भाजपातील नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश करत मेगा भरती सुरु झाली असून याची सुरूवातही आज अकोलेतुनच होत आहे. पिचाडांचाच उजवा हात समजले जाणारे सहकारातील जेष्ठ नेते सीताराम गायकर यांनी त्याच्या अनेक कार्यकर्त्याबरोबर भाजपा सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT