अकोले (अहमदनगर) : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे खंदे समर्थक असलेले कार्यकर्ते, नेते त्यांची साथ सोडत आहेत. कालच सीताराम गायकर यांनी राष्ट्रवादी जवळ केली. इतर कार्यकर्तेही हळूहळू पाय काढू लागले आहेत. असे असले तरी पिचड पिता-पुत्रांना सर्वसामान्य कार्यकर्ते, मतदारांची सहानुभूती मिळते आहे. वाड्या-पाड्यातील कार्यकर्ते स्वतः त्यांच्या भेटीला येत आहेत. दुसरीकडे पिचड यांना काँग्रेसने पक्षप्रवेशाची ऑफर आली आहे.
माजी मंत्री मधुकर पिचड यांना काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर ते म्हणाले, तुमच्यासाठी काँग्रेस उत्सुक आहे. साहेब तुमचे व काँग्रेसचे ऋणानुबंध आहेत. विचार करा, अशी ती अॉफर आहे. मात्र, पिचड यांनी दुजोरा दिला नाही. गायकर यांचा प्रवेश राष्ट्रवादीत होताच तालुक्यातील गावागावांतील कार्यकर्ते यांनी राजूर निवासस्थानी भेट देऊन आम्ही तुमचेच आमचा पक्ष तुम्हीच म्हणत त्यांची भेट घेतली.
अकोले, समशेरपूर, देवठाण, खडकी, कोतुळ, सतेवाडी, पडाळणे, निब्रळ, मोग्रस, ब्राह्मणवाडा,अंबड, विठा, इंदूरी येथील शेतकरी, युवक कार्यकर्ते यांनी येऊन पिचड यांना पाठिंबा दिला. तर दूरध्वनीवरून अनेकांचे फोन आले. माजी आमदार वैभव पिचड हे देवठाण येथील कार्यक्रमासाठी गेले असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.
बंद दाराआड चर्चा
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, माजी सभापती दादा पाटील वाकचौरे, भास्कर घुळे, बाळासाहेब नाईकवाडी व अन्य सात कार्यकर्त्यांनी माजी मंत्री पिचड यांच्याशी बंद खोलीत एक तास चर्चा केली. या भेटीनंतर चर्चा सुरू झाली आहे. साहेब काँग्रेसमध्ये या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी चर्चा रंगत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.