कोपरगाव (जि. नगर) : कमी दरात स्टील, सिमेंट देतो, असे सांगत ग्राहक व गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठक रात्रीतून ‘स्वीच ऑफ’ झाला. इचलकरंजी येथील कुटुंबासह तो परागंदा झाल्याने, पैसे गुंतवलेल्या अनेकांची झोप उडाली असल्याची चर्चा आहे. अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही, हे विशेष. (Fraud of crores of rupees from investors by offering steel cement at low prices)
मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील रहिवासी असलेला हा महाठक २००९ मध्ये तालुक्यातील एका संस्थेत कामाला होता. तेथे त्याने अनेकांशी ओळखी वाढविल्या. सुरवातीला व्याजाने पैसे घेत, संबंधितांची रक्कम व्याजासह परत करत गेला. त्यानंतर तो नोकरी सोडून गावाकडे गेला. तेथे त्याला या रॅकेटमधील गुरू भेटल्याची चर्चा असून, त्याने या धंद्याची संपूर्ण माहिती त्याला दिली. तेथून त्याने कोपरगाव, राहाता, शिर्डी व परिसरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, गुंतवणूकदार, नागरिकांचा विश्वास संपादन करीत स्वस्तात सिमेंट, स्टील देण्याचा डाव टाकण्यास सुरवात केली.
एकाची टोपी दुसऱ्याला, दुसऱ्याची तिसऱ्याला, असे करत त्याने अनेकांना मालदेखील पुरवला. नंतर ज्यांना माल नको अशा गुंतवणूकदारांना आकर्षित केले. महिन्याला पाच ते दहा टक्के परतावा दर तीन महिन्यांनी बिनबोभाट पोच केला. त्यातून अनेक जण या व्यवहारात गुंतले गेले. काही जणांनी नफादेखील मिळवला. मात्र, पैशाच्या लोभापायी पुन्हा गुंतवणूक करत गेले. अनेकांनी स्थावर मालमत्ता विकून पैसे गुंतवले. आज हा ठक ‘स्वीच ऑफ’ झाल्याने त्यांचा थरकाप उडाला आहे.
तक्रार कोण दाखल करणार?
अद्याप या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार नोंदवली नाही. त्यामुळे आता त्या ठकाविरुद्ध कोणी आवाज उठवतो की नुकसान सहन करून सर्व जण गप्प बसणे पसंत करतात, याकडे लक्ष लागले आहे.
(Fraud of crores of rupees from investors by offering steel cement at low prices)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.