नगर ः आरक्षण हा मराठा युवकांना खेळविण्याचा "गेम' होता. मनुवाद्यांची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) ती चाल होती. देशाचे सार्वजनिक उद्योग भांडवलदारांना विकलेले आहेत. त्यामुळे नोकऱ्या नाहीत. आरक्षणातून फक्त शैक्षणिक लाभ होणार होता. गुणवत्तेच्या जोरावर मराठा तरुणांनी आपले अस्तित्व दाखवून द्यावे.(Fraud of Maratha youth in the name of reservation)
आरक्षण रद्द झाल्यामुळे काहीही नुकसान झालेले नाही. आरक्षण देणारे आपणही होऊ शकतो. थोरल्या भावाची भूमिका निभवावी, अशी प्रतिक्रिया माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिली.
कोळसे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक संकटे आली. परंतु ते डगमगले नाहीत. त्यांचा आदर्श घेऊन आपण प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देताना मराठे विरुद्ध मराठेतर असे गाजर दाखविण्यात आले. ज्यांनी आरक्षण दिले त्यांनीच खऱ्या अर्थाने तुम्हाला फसविले आहे.
आरक्षणाबरोबरच इतरही अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कायदे हे विषारी मनुवादी आहेत. सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करून युवकांच्या हाती नोकऱ्याच ठेवलेल्या नाहीत. देश विकला गेला आहे. मनुवाद्यांची, आरएसएसची चाल ओळखा, असे आवाहनही कोळसे पाटील यांनी केले आहे.(Fraud of Maratha youth in the name of reservation)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.