अहिल्यानगर

Ganeshotsav 2023 : सोनमाळी विद्यालयात इको-फ्रेंडली गणपती ; कर्जतकरांची दर्शनासाठी गर्दी; शिक्षकांचा उपक्रम

सर्वसामाजिक संघटनेच्या कामाची प्रेरणा घेऊन साकारलेल्या या इको- फ्रेंडली गणरायाला पाहण्यासाठी व त्याचे दर्शन घेण्यासाठी कर्जतकर गर्दी करीत आहेत.

नीलेश दिवटे

कर्जत - वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगरचनेतील ओळी तंतोतंत खऱ्या ठरवीत, देव दगडात नसून वृक्षात असल्याचा संदेश देत येथील सोनाबाई सोनमाळी विद्यामंदिरात झाडालाच गणरायाचा आकार देत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आहे.

सर्वसामाजिक संघटनेच्या कामाची प्रेरणा घेऊन साकारलेल्या या इको- फ्रेंडली गणरायाला पाहण्यासाठी व त्याचे दर्शन घेण्यासाठी कर्जतकर गर्दी करीत आहेत. नित्य धार्मिक पूजेबरोबरच सर्वसामाजिक संघटनांचे शिलेदार व गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते गणरायाचे पूजन व आरती करण्यात आली.

शाडूमाती व पीओपीपासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व निसर्गाचा समतोल, तसेच वृक्षांची गरज अधोरेखित करण्यासाठी शाळेच्या प्रांगणातील झाडाला हुबेहूब गणरायाचा आकार देत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तेथे निसर्गाचा समतोल राखून पान व फुलांची आरास करण्यात आली आहे. या विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक आशिष निंबोरे व शिक्षिका जगदाळे यांची ही संकल्पना असून, त्यांना मुख्याध्यापिका इर्शाद पठाण, पर्यवेक्षक सुरेश भोयटे, ज्येष्ठ शिक्षक संजय देशमाने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

रोहित पवार यांच्याकडून कौतुक

कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून नाम फाउंडेशन, तसेच सकाळ रिलीफ फंडातून कर्जत- जामखेड तालुक्यांत जलसिंचनाची कामे, तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. याही उपक्रमाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीटरवर खास पोस्ट टाकत कौतुक केले आहे.

एक हजारपेक्षा जास्त दिवस अविश्रांत श्रमदान करीत वृक्षलागवड करणारी सर्वसामाजिक संघटना, नगरपंचायत यांच्या कामातून प्रेरणा घेऊन शाळेतील शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी संकल्प केला, की पर्यावरणपूरक गणपती तयार करायचा व प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

इर्शाद पठाण, मुख्याध्यापिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT