लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.jpg sakal
अहिल्यानगर

मानकरांच्या घरात सापडले घबाड ;लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुण्यातील घरात सापडली कागदपत्रे

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यांना लाच घेताना काल (बुधवार) अटक करण्यात आली. दरम्यान आज (गुरुवारी) पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या पुण्यातील घरावर छापा घातला. यावेळी रोख रकमेसह सोने, चांदीसह काही मालमत्तेची कागदपत्रे हाती लागली आहेत.

प्रवीण मानकर हे अहमदनगर महापालिकेत मुख्य लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे अहमदनगर येथील असून, सध्या त्यांचे कुटुंब पुणे येथे वास्तव्यास आहे. महापालिकेतील एका कामाचे बिल मंजुरीसाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधकचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मानकर यांच्या संपत्तीची चौकशी आता लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेली आहे. मानकर यांच्या पुण्यातील विश्रांतवाडी येथील उत्तम टाऊनस्केपमधील फँटसी या फ्लॅट क्रमांक १०२ मध्ये आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने झाडाझडती घेतली. या वेळी त्यांच्या घरात ११ लाख ५० हजारांची रोख रक्कम, ५४० ग्रॅम सोन्याचे दागिने, दीड किलो चांदी आणि तीन फ्लॅटची कागदपत्रे, अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. याबाबत पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी मानकर यांच्या पत्नीकडे या संपत्तीच्या स्त्रोताबाबत विचारणा केली आहे. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. ही सर्व रक्कम व कादपत्रांसह सोने, चांदीचे दागिने जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे तपास करीत आहेत.

संपत्ती विवरणात नोंदीची माहिती घेणार का?

दर वर्षी शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या संपत्तीचे विवरण वरिष्ठांना सादर करावे लागत आहे. तसे या वर्षीही मानकर यांनी आपल्या वरिष्ठांना संपत्तीचे विवरण दिलेले असेल. त्यात त्यांनी आपल्या घरातील सोने व फ्लॅटची नोंद केलेली आहे की नाही, याची तपासादरम्यान चौकशी होणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.

मानकर यांच्या पुणे येथील घराची झडती पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घेतली आहे. त्यामध्ये जो मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याचे विवरण व पंचनामा अहवाल उद्या आम्हाला मिळणार आहे. त्यानंतर त्या मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे.

- हरीश खेडकर,

पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर.

गोपनीय अहवाल तपासणार का?

दर वर्षीच शासकीय अधिकाऱ्यांचा गुप्त अहवाल त्यांच्या वरिष्ठांकडून दिला जात आहे. या अहवालात मानकर यांच्याबाबत काय लिहिलेले आहे, याची तपासणी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT