gujarat scammers fraud trading investment dabba trading ahmednagar Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime News : डब्बा ट्रेडिंगमध्ये अडकलेले सावध; गुजरातच्या तिघांचा तपास लागेना

डब्बा ट्रेडिंग हा शेअर मार्केटमधील एक अनधिकृत वापरला जाणारा प्रकार आहे. त्यामध्ये बनावट ॲपचा वापर करून ट्रेडिंग केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar News : ‘डब्बा ट्रेडिंगमुळे अनेकजण डब्ब्यात’ हे वृत्त प्रसिद्ध होताच अशा पद्धतीने ट्रेडिंग करत असलेले अनेक गुंतवणूकदार सावध झाले आहेत. गुंतवणूक केलेल्यांकडे गुंतविलेल्या रकमेची मागणी करू लागले आहेत. तर गुजरातच्या काही भामट्यांनी नगरच्या गुंतवणुकदारांचा संपर्क बंद केला आहे.

त्याचाच भाग म्हणून नुकतेच कोतवाली पोलिस ठाण्यात एका गुंतवणूकदाराने तक्रार दिली आहे. गुजरातच्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. डब्बा ट्रेडिंग हा शेअर मार्केटमधील एक अनधिकृत वापरला जाणारा प्रकार आहे. त्यामध्ये बनावट ॲपचा वापर करून ट्रेडिंग केले जाते.

किंवा रोख रक्कम घेऊन मोठा नफा देण्याचे आमिष दाखवून हळूहळू गुंतवणुकदारांना जाळ्यात ओढले जाते. जास्त गुंतवणूक झाली, की ट्रेड खाली गेला, असे सांगून हे पैसे मिळणार नाहीत, असे सांगितले जाते. ते मिळविण्यासाठी अजून काही पैसे लावावे लागतील, अशी अटही टाकली जाते.

एखादा गुंतवणूकदार पैसे परत घेण्याबाबत खुपच आग्रही असेल, तर त्याच्याशी संपर्कच बंद केला जातो. संबंधित मोबाईल स्वीच ऑफ केले जातात. अशा फसवणुकीतून नगर जिल्ह्यातील कोट्यवधी रुपये गुजरात तसेच अन्य राज्यातील बनावट ब्रोकरने लांबविले आहेत. अनेक व्यवहार रोख झाले असल्याने तसेच हा व्यवहारच बेकायदेशिरपणे होत असल्याने पोलिसांचा,

आयकर विभागाचा ससेमिरा आपल्या मागे लागेल, यामुळे तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे येत नाहीत. याबाबत ‘सकाळ’ने ता. १९ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून या प्रकाराचा पर्दाफाश केला. ते वाचून आपण फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेलो आहोत, अशी अनेकांना जाणीव झाली. त्यांनी आता आपले पैसे परत घेण्याचा तगादा संबंधितांकडे लावल्याचा समजते.

हे लक्षात ठेवा

  • शेअर मार्केटमध्ये कॅशने व्यवहार होत नाहीत

  • स्वतःच्याच डिमॅट अकाउंटवर पैसे गुंतवावेत

  • अधिकृत ब्रोकरकडून सल्ला घेणे योग्य

  • अभ्यासू, तज्ज्ञ व्यक्तींकडून गुंतवणुकीबाबत माहिती घ्यावी

  • स्वतः अभ्यास करून ट्रेड लावणे आवश्यक

  • अनोखळी व्यक्तीवर व्यवहार करताना काळजी घ्यावी

  • परप्रांतीय व्यक्तींशी व्यवहार टाळावा

  • धोका दिसू लागल्यास तातडीने आपले पैसे परत घ्यावेत

  • फसवणूक होत असल्याचे समजताच पोलिसांशी संपर्क करावा

शहरातील व्यापारीही अडकले

डब्बा ट्रेडिंग प्रकारात नगर शहरातील अनेक व्यापारी अडकल्याचे बोलले जाते. बदनामीमुळे उघडपणे तक्रार देण्यास कोणी पुढे येत नाही. मात्र, दहा लाखांपासून ते एक कोटींपर्यंत रक्कम एका व्यक्तीची, असे शेकडो व्यापारी अडकले आहेत.

त्यांच्या सुमारे ५०० ते ६०० कोटींच्या रकमेला चुना लागला असल्याचे बोलले जाते. काही रक्कम हवालामार्फत पाठविल्या जात असल्याने संबंधित व्यक्ती पुरावेही ठेवत नाहीत. आपण फसलो असल्याचे लक्षात येऊनही काहीही करता येत नाही, अशी स्थिती या व्यापाऱ्यांची झाली असल्याचे समजते.

कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

शेअर मार्केटमध्ये ज्यादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुजरात (अहमदाबाद) येथील तिघांनी ११ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अहमदाबाद गुजरात येथील आरव पटेल, नीलेश पटेल, चिराग पटेल या तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. या तिघांनी नगरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करीत त्यांना शेअर मार्केटमध्ये जास्त नफा देण्याचे आमिष दाखविले. दोन टप्प्यात ११ लाख रुपये घेऊन पोबारा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानला धक्का; Jasprit Bumrah ने मोडला कपिल देव यांचा विक्रम, ७ मोठे पराक्रम

Eknath Shinde: शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंची मागाठाणेत हॅट्‌ट्रिक, जाणून घ्या विजयाची इनसाइड स्टोरी

Sangli Election Results : पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात? खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यापैकी एकाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT