Hassan Mushrif esakal
अहिल्यानगर

...तर पुन्हा मत मागायला येणार नाही - हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा

अकोले (जि. अहमदनगर) : आमदार डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamte) यांच्या वचनपूर्तीसाठी अकोले शहराच्या विकासासाठी तीन वर्षांत ५० कोटी रुपयांचा निधी देतो. निधी उपलब्ध झाला नाही, तर पुन्हा मत मागायला येणार नाही. तीन महिन्यांत राज्य सरकार डेटा गोळा करून ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) वाचविल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केले. अकोले येथे नगरपंचायत निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.

आम्ही OBC आरक्षण मिळवून देणारच - मुश्रीफ

यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे नाव न घेता मुश्रीफ म्हणाले, एका माणसाला सर्व पदे दिली. मात्र त्यांनी शेवटी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडली. त्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांचा पराभव करा. आम्ही आमदार लहामटे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. ओबीसी आरक्षण न मिळण्यास भाजप (BJP) जबाबदार आहे. तरीही आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून देणारच, असे आश्‍वासन त्यांनी दिले. गेल्या पाच वर्षांत इतका निधी मिळाला नाही, तेवढा निधी या दोन वर्षांत दिला आहे. अकोले शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मुश्रीफ म्हणाले.

आमदार लहामटे यांनी मी रेशन घोटाळ्यात एक दाणा देखील घेतला असेल, तर आमदारकीचा राजीनामा देईल. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम पाटील गायकर, मच्छिंद्र धुमाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते. गायकर, धुमाळ, नाईकवाडी यांची भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT