नेवासे (जि. अहमदनगर) : तालुक्यात मंगळवारी (ता. ५) रात्री वादळी वारा व विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. पावसाने पिकांसह घर-गोठ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. दरम्यान, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी आज (बुधवार) नुकसानीच्या पाहणीचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत.
मंगळवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळासह पावसाने सर्वाधिक नुकसान जेऊर हैबती गावासह शिवारातील पिकांचे नुकसान झाले. या भागातील केळी, ऊस, कपाशी, सोयाबीन, मका, कडवळ ही पिके वादळाने पूर्णतः भुईसपाट झाली. अनेक ठिकाणी वस्त्यांवरील वृक्ष पडल्याने अनेक घरांसह जनावरांच्या गोठ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कांदा चाळींचेही मोठे नुकसान झाले.
या वादळाचा कुकाणे, देवसडे, तेलकूडगाव, भेंडे, देवगाव, देडगाव, तरवडी या गावांनाही काही प्रमाणात फटका बसला आहे. उसाचे आगर समजला जाणाऱ्या कुकाणे-भेंडे भागात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाले. केळी व डाळिंब बागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
कुकाण्यात वीज गायब
वादळी पावसाने कुकाणे व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरातील काही गावांत आज (बुधवार) सात वाजेच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. कुकाणे गावात पंचवीस तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.
वादळी पावसात ऊस, मका, कपाशी ही पिके भुईसपाट झाली. प्रशासनाने सर्व नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
- भगवान रिंधे, प्रगतिशिल शेतकरी, जेऊर हैबती
घराचे, पिकांचे नुकसान झाल्याची माहिती घेण्याचे काम महसूल यंत्रणेनेकडून सुरू आहे. सर्व माहिती हाती आल्यावरच किती नुकसान झाले, याची माहिती समजेल.
- रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.