जामखेड (जि. अहमदनगर) : जामखेडकरांना कोरोनाच्या (Corona) काळात आधारवड ठरलेल्या जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पास ‘होगनास इंडिया’ (Hoganas India) कडून २६ लाख रुपये किमतीचा हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या प्लँट देणगी स्वरूपात देण्यात आला. या प्लँटमुळे येथील आरोग्य सुविधेला अधिकच बळकटी मिळाली आहे. या प्रकल्पाला आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यानंतर मोठ्या प्रमाणात मदत करणारी ही दुसरी स्वयंसेवी संस्था ठरली आहे.
सामाजिक बांधिलकीतून देणगी
जामखेड येथील डॉ. आरोळे हॉस्पिटलच्या माध्यमातून वर्षभरापासून कोविड काळात सुमारे तेरा हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. याकाळात हॉस्पिटलला ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक गोष्टींची गरज भासत होती. होगनास इंडियाने सामाजिक बांधिलकी जपत ऑक्सिजननिर्मिती प्लँट देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिला.
नगर येथील नवजीवन प्रतिष्ठान या संस्थेच्या पुढाकाराने जामखेड येथील डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा आरोळे संचालित ग्रामीण आरोग्य प्रकल्पा अंतर्गत होगनास इंडिया प्रा. लि. च्या वतीने देण्यात आलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्लँटचे लोकार्पण कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील मुरलीधरन यांच्या हस्ते करण्यात आले.
"कोरोना काळात रुग्णांची मनोभावे सेवा केली. सेवा देताना अनेक आडचणी निर्माण झाल्या. मात्र त्यावर आपण मात केली. समाजातील विविध घटकांनी मदतची हात दिला. आमदार रोहित पवार खंबीरपणे पाठीशी राहिले." - डॉ. रवी आरोळे, संचालक, ग्रामीण आरोग्य केंद्र
‘होगनास'चे सामाजिक दायित्व
होगनास इंडियाने कोरोना काळात ‘नवजीवन’च्या समन्वयाने चिचोंडी पाटील येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, निंबळक येथील अनामप्रेम संस्था, एमआयडीसी येथील कामगार कोविड सेंटर यांना बेड व गाद्या, बुऱ्हानगर प्राथमिक आरोग्य केंद्रास कोविड संरक्षणात्मक साहित्याची देणगी दिले आहे. तसेच १८ लाख रुपयांचे तीन व्हेंटिलेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत.
कंपनीचे ऑपरेशन डायरेक्टर डॉ. शरद मगर, एच. आर. व ॲडमिन मॅनेजर सुभाष तोडकर, ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक डॉ. रवी आरोळे, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, जयेश कांबळे, भगवान राऊत, असिफ पठाण आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.