संगमनेर : महिन्यापूर्वी संगमनेर शहरातील तीन बत्ती परिसरात पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या आठवणी अद्याप विरल्या नाहीत, तोच ‘मागच्या वेळी तुमच्या लोकांना पळवून मारले, तरीही तुम्ही इकडे कशाला आलात? आमच्या भागात फिरकायचे नाही,’ अशी धमकी तीन तरुणांनी गस्तीवरील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना दिली. संगमनेरातील तीन बत्ती चौकात सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
या बाबत पोलिस कर्मचारी रामेश्वर पंडित यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपींविरुद्ध, लोकसेवकाला सार्वजनिक कामात अडथळा केल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Sangamner three youths threatened the police)
पोलिस कर्मचारी पंडित आपल्या दोन सहकाऱ्यांसह गस्त घालीत असताना, त्यांच्याजवळ आलेल्या तीन युवकांनी मागील घटनेचा संदर्भ देत, ‘आमच्या गल्लीत परत यायचे नाही. नाही तर परिस्थिती खराब करून टाकू,’ असा सज्जड दम भरला.
या प्रकारानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी घडलेली घटना शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. दरम्यान, जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच अशी वेळ येत असेल, तर ही बाब गंभीर आहे. संबंधित तिघांना पकडून पोलिसांनी कठोर कारवाई करावी. पोलिसांना दम भरणाऱ्यांची गय करू नये, अशी मागणी होत आहे. (In Sangamner three youths threatened the police)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.