Increase in drought in Nevase water scarcity will increase Milk business in trouble Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : नेवाशात दुष्काळाच्या झळांत वाढ; आवर्तन संपल्यावर पाण्याची टंचाई वाढणार; दूध व्यवसाय अडचणीत

मुळा कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच बागायत व जिरायत पट्ट्यात दुष्काळाच्या झळा दिसू लागल्या आहेत. उन्हाचा पारा कमी होणारा नसल्याने पाणीटंचाईत वाढ होत आहे.

विनायक दरंदले

सोनई : मुळा कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच बागायत व जिरायत पट्ट्यात दुष्काळाच्या झळा दिसू लागल्या आहेत. उन्हाचा पारा कमी होणारा नसल्याने पाणीटंचाईत वाढ होत आहे. यामुळे पिके जळून जात आहेत. उष्णतेने कांदा खराब होऊ लागला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागल्याने कालव्याचे पाणी बंद होताच अनेक गावांत पाणीटंचाईत वाढ होणार आहे.

मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने हिवाळ्यातच अनेकांच्या विहिरींनी तळ गाठला होता, तर कूपनलिका गुळण्यावर आल्या होत्या. मुळा धरणातून दोन महिन्यांपूर्वी सोडलेल्या आवर्तनाने शेतकऱ्यांच्या पदरात गव्हाचे पीक पडले,

तर एक एप्रिल २०२४ रोजी सोडण्यात आलेल्या उन्हाळी आवर्तनाने कांदा, ज्वारी, हरभरा, भाजीपाला व चारा पिकांनी कसाबसा तग धरला आहे. आवर्तनाचा कार्यकाळ ५ मे २०२४ रोजी संपल्याने आता शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाण्याने प्रवरा नदीवरील तीन बंधारे भरून देण्यात आल्याने आता मुळा नदीवर असलेल्या शिरेगाव व अंमळनेर येथील बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यातील सुरेशनगर व धनगरवाडी येथे मागील महिन्यात पाण्याचे टँकर सुरू झाले असून, दहाहून अधिक गावांनी टँकरचा प्रस्ताव दिला आहे. अनेक गावांत असलेले तलाव, बंधारे, गावतळे व साखळी बंधारे भरून देण्याची ओरड सुरू झाली आहे.

चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गाय, बैल व इतर लहान जनावरांना घोडेगाव (ता. नेवासे) येथील बाजाराचा रस्ता दाखविला आहे. दुष्काळजन्य स्थिती सर्वत्र असल्याने बाजारात जनावरांची आवक अधिक असली, तरी त्यांची मातीमोल भावाने विक्री होत असल्याचे चित्र आहे.

लोहगाव, मोरयाचिंचोरे, वांजोळी, राजेगाव, मोरगव्हाण या जिरायत भागात पाण्याची चिंता अधिक वाढली आहे. पंधरा दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने शेतीसह दूध व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. दूध उत्पादनात घट झाली आहे.

आवर्तन सुरू असल्याने थोडाफार पिण्याच्या पाण्याचा दिलासा आहे. शेतपीक होरपळून गेली आहेत. पुढील दीड महिन्याचे मोठे आव्हान आहे.

- अंबादास आव्हाड, सरपंच, राजेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

SCROLL FOR NEXT