Crime  sakal
अहिल्यानगर

karjat Crime : वाहनांवर बोगस पाट्यांचा सुळसुळाट,शहरासह तालुक्यातील स्थिती : कारवाईची मागणी

karjat Crime : कर्जत शहरात व तालुक्यात बोगस पाट्या लावणाऱ्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : शहरासह तालुक्यात वाहनावर बोगस पाट्या लवणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरासह तालुक्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनावर बोगस पाटी लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शहरासह तालुक्यात सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर विविध पक्षाचे पदाधिकारी, सरपंच पदावर स्वतः नसून पत्नी किंवा कुटुंबातील सदस्य, पोलिस, शासकीय वाहनासह विविध पाट्या लावत गैरफायदा उठविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे यंत्रणा व नागरिकांत संभ्रम वाढत असून, गुन्हा किंवा गुन्हेगार गैर प्रकार करण्यासाठी वापर करू शकतात, अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली.

बसस्थानक परिसर व दादा पाटील महाविद्यालयात शाळा भरणे व सुटण्याच्या वेळी काही टवाळखोर हॉर्नचा मोठा आवाज करत धूम स्टाईलने वाहने चालवीत आहेत. यामध्ये अल्पवयीन युवकांचा मोठा भरणा आहे. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे किंवा नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे. नसल्यास त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

याबाबत आपण स्वतः लक्ष घालीत आहोत. शहरात व तालुक्यातील वाहने तपासण्याबाबत सूचित करत आहे. असे बोगस नेमप्लेट लावलेली वाहने आढळल्यास वाहन अधिनियम कायद्यानुसार मालकावर व सध्या चालवीत असलेल्या चालकावर कारवाई करण्यात येईल.

- विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत.

हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या नेमप्लेट वापरण्यासाठी नियम आहेत. त्याचे पालन करणे गरजेचे आहे, मात्र त्या पदावर नसताना वापर करणे हा गुन्हा आहे. याबाबत शहरासह तालुक्यात तपासणी पथके नियुक्त करण्यात येतील. नाका बंदी करून त्यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

-मारुती मुळूक,पोलिस निरीक्षक, कर्जत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT