inspiring story of aditya vadvanikar journey State Tax Inspector Sakal
अहिल्यानगर

Success Story : शिक्षण हाच एकमेव परिस्थिती बदलण्याचा पर्याय.. रिक्षा चालकाचा मुलगा राज्यकर निरीक्षक

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar News : घरची परिस्थिती तशी जेमतेमच. वडील रिक्षा चालक तर आई आदिवासी आश्रम शाळेत कार्यरत. यशस्वी व्हायचंय अस ठरवलं तर माणूस नक्कीच यशस्वी होतो, याचे उदाहरण म्हणजे अहमदनगर शहरातील आदित्य वडवणीकर.गरिबीच्या परिस्थितीवर मात करून त्याने राज्यकर निरीक्षक पदाला (वस्तू व सेवा कर-जीएसटी-विभाग) गवसणी घातली.

वडवणीकर कुटुंब बीड जिल्ह्यातील राजेगाव (ता. वडवणी). त्यांच्या कुटुंबाचा परंपरागत हातमागाचा व्यवसाय असल्याने कुटुंब १९६५च्या दरम्यान अहमदनगर येथे स्थायिक झाले. हातमागाचा व्यवसाय सुरू असताना आधुनिकीकरणाच्या युगात प्रिंटिंगच जग सुरू झाले आणि हातमागाचा व्यवसाय मागे पडला.

त्यामुळे कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावली. आदित्यचे वडील दत्ता वडवणीकर पदवीधर झाले. नोकरी लागेल, या आशेने सर्वत्र फिरले. परंतु, नोकरी लागली नाही. पुढे शालन यांच्याबरोबर लग्न झाले. महापालिकेचे पहिले विरोधी पक्षनेते बहिरनाथ वाकळे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी लग्नानंतर पत्नीला शिकवले.

या शिक्षणामुळे आदिवासी विभागांमध्ये आश्रम शाळेत नोकरी मिळाली. त्यामुळे कुटुंबाला थोडे स्थैर्य प्राप्त झाले. दत्ता यांनी काही ठिकाणी खासगी नोकरी केली. या नोकरीत होणारी पिळवणूक पाहून जुनी रिक्षा व विकत घेतली.

रिक्षाचा व्यवसाय सुरू केला, तोपर्यंत मुलेही मोठी झाली. मुलांच्या चांगले शिक्षण देण्यावर भर दिला. आदित्यने अकरावी-बारावीला त्यांनी रेसिडेन्सिअल हायस्कूलला प्रवेश घेतला. त्याने न्यू आर्ट्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षणही घेतले.

तेव्हापासून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. शालेय अभ्यास करताना त्याने तबला विशारद ही पदवी मिळवली. त्याने रयत शिक्षण संस्थेचे श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालय पदव्युत्तर शिक्षण घेतले. तेथून ऑरगॅनिक केमिस्ट्री विषयात एमएस्सीची पदवी प्रथम श्रेणीत मिळविली.

तत्पूर्वी, घरात वारकरी संप्रदाय आणि पुरोगामी चळवळीचा वारसा होताच त्यामुळे आदित्यने वेगवेगळ्या वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये सहभाग नोंदवला होता. एमएस्सी झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. जानेवारी २०२३ रोजी पुणे महापालिकेती लिपिक- टंकलेखक पदाची परीक्षा पास होऊन शासकीय सेवेत पर्दापण केले.

शिक्षण हाच एकमेव परिस्थिती बदलण्याचा पर्याय आहे. या तत्वानुसार मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले. आदित्य हा राज्यकर निरीक्षक झाला, ही बाब कुटुंबासाठी खूप आनंदाची आहे. यामध्ये माझी आई आणि माझी पत्नी यांचा खूप मोठा वाटा आहे. वडील गेल्यानंतर आईने आणि पत्नीनेच कुटुंब सावरलं. पुतणी इंजिनिअर, मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

- दत्ता वडवणीकर, आदित्यचे वडील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT