कर्जतच्या रणांगणात पुन्हा रोहित पवार विरुध्द राम शिंदे 'सामना' sakal media
अहिल्यानगर

कर्जतच्या रणांगणात पुन्हा रोहित पवार विरुध्द राम शिंदे 'सामना'

नवे अनेक चेहरे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत

नीलेश दिवटे

कर्जत : गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी भोपळाही फोडू शकली नव्हती. आता आमदार रोहित पवार येथे असल्याने पक्षाच्या प्रतिष्ठेची, तर सत्ताधारी भाजप आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. मात्र, ते गड राखणार की राष्ट्रवादीसह मित्रपक्ष महाविकास आघाडीचा प्रयोग करीत मुसंडी मारणार? महाविकास आघाडीला सोबत घेऊन जाण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले व युवकचे तालुकाध्यक्ष सचिन घुले आयोजित स्नेहभोजनास भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आवर्जून हजेरी लावली. विरोधक म्हणून भूमिका बजावणारे व आता राष्ट्रवादीत आलेल्या नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनीही घुले यांना घास भरवला. त्यामुळे चर्चा रंगत आहे.

नवे अनेक चेहरे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, अशी तिरंगी लढत होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. नोव्हेंबर २०२१ नुसार १४ हजार सातशे मतदार आहेत. त्यात चारशे एकोणीस नव्या मतदारांची भर पडली आहे. मात्र, अजून अंतिम मतदारयादी जाहीर व्हायची आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरपंचायतीमध्ये भाजपने बाजी मारत सत्ता स्थापन केली. प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान नामदेव राऊत यांना मिळाला. नंतर विधानसभा निवडणूक झाली. तीत राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कर्जत-जामखेडच्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी तत्कालीन मंत्री शिंदे यांचा पराभव केला. त्यांचे समर्थक असलेले नामदेव राऊत राष्ट्रवादीत दाखल झाले.

पक्षीय बलाबल

कर्जत नगरपंचायतीच्या गेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल असे : भाजप - १२, काँग्रेस ४ , अपक्ष - १, राष्ट्रवादी काँग्रेस- ०

"या निवडणुकीत लोकहिताचे पॅनल करून विकासाचा मुद्दा लोकांसमोर आणणार आहोत. महाविकास आघाडी व्हावी, अशी इच्छा आहे. सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली तर विकासासाठी सतरा जागांवर लोकहिताच्या पॅनलचे उमेदवार निवडून येतील."

- रोहित पवार, आमदार.

"महाविकास आघाडीत या निवडणुकीसंदर्भात अद्याप काहीही चर्चा झाली नाही. यामुळे आम्ही सर्व सतरा जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, याबाबत वरिष्ठांचा निर्णय अंतिम राहील."

- प्रवीण घुले, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस, कर्जत

"कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार आहे. विकासकामांच्या जोरावर जे आले त्यांच्यासह, जे गेले त्यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. कर्जतमध्ये भाजपचीच सत्ता येईल."

- राम शिंदे, माजी मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात घसरण कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Latest Marathi News Updates live : नवाब मलिक यांच्या जावयाच्या मृत्यूनंतर चालकावर गुन्ह्यात वाढ

Kolhapur Elections : दक्षिण, उत्तर, इचलकरंजी, कागल, शाहूवाडीत दुरंगी लढती; राधानगरी, चंदगडमध्ये बंडखोर जोरात

Nagpur Crime: मृतदेहाला केमिकल लावण्यासाठी मागितले पैसे; नागपूरध्ये धक्कादायक प्रकार

Eknath Shinde: आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? होऊन जाऊ द्या "दूध का दूध पानी का पानी"

SCROLL FOR NEXT